कला-क्रिडामधील गुणवंत विद्यार्थ्यांना सुतारवाडी शाळेत गौरविले

0
548

स्वराज्यनामा ऑनलाईन  :  यशवंतराव कला क्रीडा महोत्सवात यशस्वी कामगिरी करून क्रीडानैपुण्य प्राप्त खेळाडू विद्यार्थ्यांना सुतारवाडी, ता.मुळशी येथे गौरविण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा सुतारवाडी येथे केंद्र व बिट स्तरावर या गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

            याप्रसंगी माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य सुभाष अमराळे, जिल्हा परिषद सदस्य  अंजली कांबळे, सागर काटकर, कासार आंबोली सरपंच श्रद्धाली सुतार, सुवर्णा सुतार, उपसरपंच शेखर शिंदे, राजेंद्र मारणे, सुरज सुतार, महेश मानकर, सुवर्णा मारणे, छाया भिलारे, अविनाश कानगुडे, एकनाथ सुतार, सुभाष कानगुडे, सागर कांबळे आदि उपस्थित होते.

            सुतारवाडीचे मुख्याध्यापक विनोद उबाळे, मानकरवाडी मुख्याध्यापक युवराज ओव्हाळ, कासार आंबोली मुख्याध्यापिका सोनाली हिरे, शिंदेवाडी मुख्याध्यापक चंद्रकांत पटेकर, भवानीनगर मुख्याध्यापक आप्पासाहेब पाटील, व्यवस्थापन समिती अध्यक्षा पार्वतीताई गाडे यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे आयोजन माजी सरपंच गणेश सुतार, सतिश सुतार आणि गोरख सुतार यांनी केले होते. या कार्यक्रमास सर्व ग्रामस्थं व शिक्षक, शिक्षिका आवर्जुन उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here