जमिन खरेदी विक्रीच्या व्यवहारातून मुळशीतल्या माजगाव येथे एकाचा खून

0
3287

स्वराज्यनामा ऑनलाईन : जमिन खरेदी विक्रीच्या व्यवहारातून मुळशी तालुक्यात खुन झाल्याची घटना घडली आहे. मुळशी धरण भागातील माजगांव येथे मंगेश नंदु खोंडगे (वय.३५ वर्ष, रा माजगांव, ता.मुळशी,जि.पुणे) याचा धारदार शस्ञाने वार करून खून करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

        पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मौजे माजगांव येथील आवळीची दस येथील फाँरेस्ट मध्ये आरोपी अशोक गणपत गायकवाड अणि भरत गणपत गायकवाड (दोघे रा.माजगांव, ता.मुळशी) यांनी जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारातून दिलेले एक लाख रूपये परत देत नाही या कारणावरून मंगेश खोंडगे याच्या गळ्यावर आणि हातावर धारदार शस्ञाने वार करून खून केला. याप्रकरणी प्रकाश नथू मापारे (वय.३८, रा. सालतर, ता.मुळशी) यांनी फिर्याद दिली असून या घटनेचा पुढील तपास पौड पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ हे करत आहेत.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here