घोटवडेच्या उपसरपंचपदी संदिप खानेकर यांची बिनविरोध निवड

0
1290

स्वराज्यनामा ऑनलाईन :  घोटवडे, ता.मुळशी च्या उपसरपंचपदी संदिप सुदाम खानेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. रिक्त असलेल्या उपसरपंच जागेसाठी आज गुरूवार दि. 28 नोव्हेंबर रोजी ही निवडणूक घेण्यात आली. निवडीनंतर ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य यांच्यासह ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.

              या निवडणुकीस खानेकर यांचा एकमेव अर्ज आल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिलेले ग्रामविकास अधिकारी जे.एम.भोंग यांनी दिली आहे. सरपंच निलेश गोडांबे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक झाल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य कौशल्या भेगडे, पल्लवी भेगडे, कुंडलिक मातेरे, नितिन भेगडे, मा.सरपंच अभिजित वायकर, रजनीकांत धुमाळ, सविता गोडांबे, गितांजली गोडांबे, जयश्री देवकर, कांचन धुमाळ, दिपाली साळुंके आदि उपस्थित होते.

              संदिप खानेकर यांच्या निवडीनंतर त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, शिवसेना भोर विधानसभा संघटक प्रकाश भेगडे, माजी सरपंच आनंदा घोगरे, रमेश शेळके, रविकांत धुमाळ, विठ्ठल गोडांबे, मनसेचे युवा नेते अनिल मातेरे, रामचंद्र देवकर, वातुंडे सरपंच अमोल शिंदे, सचिन साळुंके, बाजीराव शेळके, प्रदीप गोडांबे, जनार्दन मातेरे, तुकाराम गुंडगळ, नवनाथ भेगडे, साहेबराव भेगडे, बाळा गोडांबे आणि विविध मान्यवर व समस्त ग्रामस्थं उपस्थित होते.

              निवडीनंतर युवा सरपंच संदिप खानेकर यांनी सांगितले की, गावाच्या विकासामध्ये हातभार लावायला मिळणे हे भाग्याचे आहे. त्याचा फायदा घेऊन जास्तीत जास्त योगदान देण्याचा मनापासून प्रयत्न करणार आहे. सरपंच व सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी यांना सोबत घेऊन हे योगदान राबवण्याचा प्रयत्न करणार आहे. यावेळी सत्कारानंतर खानेकर यांची ग्रामदैवत रोकडोबा मंदिरापासून गावठाणातल्या शिवछत्रपती स्मारकापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here