कात्रज जवळ शिंदेवाडी येथे शिवशाही बस दरीत कोसळून २ प्रवाशांचा मृत्यू, २८ जखमी

0
1429

चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात : बसची २ ते ३ वेळा पलटी

स्वराज्यनामा ऑनलाईन, कापूरहोळ (प्रतिनिधी)  : 

             प्रवाशांना घेऊन जाणारी शिवशाही बस कात्रज जवळील शिंदेवाडी, ता.भोरच्या हद्दीत दरीत कोसळली. यात २ जणांचा मृत्यु झाला असून चालकासह २८ प्रवासी जखमी झाले आहेत. स्वारगेटवरून सांगलीकडे प्रवासी घेऊन जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने बस दरीत कोसळून ही भीषण घटना झाली आहे.

             मिळालेल्या माहितीनुसार, शिवशाही बस ३० ते ३५ प्रवाशी घेऊन स्वारगेटवरून सांगलीला निघाली होती. त्यावेळी दुपारी दीड वाजता कात्रजनंतर शिंदेवाडी जवळ आल्यानंतर वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट २५ फूट दरीत कोसळली आहे. बस २ ते ३ वेळा पलटी झाली. त्यामुळे बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात प्रवासी आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अग्निशमन दल येण्यापूर्वीच स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. मदतीसाठी भारती विद्यापीठ आणि राजगड पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.

             इतर प्रवासी जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या ठिकाणी राजगड पोलीस, भारती विद्यपीठ पोलीस ठाण्याचे बिट मार्शल आणि अग्निशमन दल दाखल झाले आहे. दरम्यान या घटनेमुळे मोठी खळबळ माजली आहे.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here