पीक विमा आणि मदत त्वरित मिळावी यासाठी शिवसेनेचे ठिय्या आंदोलन

0
480

स्वराज्यनामा ऑनलाईन :  पीक विम्याचे पैसे त्वरीत मिळावे यासाठी मुळशी तालुका शिवसेनेने तहसिल कार्यालय, पौड, ता.मुळशी येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. तसेच शेतकर्यांना जाहिर झालेली मदत लवकरात लवकर मिळावी अशीही मागणी आंदोलन कर्त्यांनी केली आहे.

             अतिवृष्टी व अवकाळी पाऊस यांमुळे भातपिके तसेच अन्य पीकांचे झालेले नुकसान यांचे पंचनामे होऊन अनेक दिवस झाले आहे. तरी सुद्धा शेतकर्यांच्या खात्यामध्ये पैसै जमा झालेले नाहीत. अतिवृष्टी आणि शेतीवर येणारी अन्य संकटे यामुळे शेतकरी हैराण झालेला आहे. शासनाकडुन मिळणारी रक्कम तुटपुंजी तसेच वेळेत न मिळणारी आहे. ती वेळेत मिळाल्यास पुढील पीके वेळेत घेण्यास मदत होईल. म्हणून लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी मुळशी तालुका शिवसेनेच्या वतीने हे ठिय्या आंदोलन घेण्यात आले होते.

             या ठिय्या आंदोलनास सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब चांदेरे, भोर विधानसभा संघटक प्रकाश भेगडे, भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक राम गायकवाड, तालुकाप्रमुख संतोष मोहोळ, माजी उपसभापती भानुदास पानसरे, युवासेना उपजिल्हाधिकारी सचिन खैरे, शिवसहकार सेना जिल्हासंघटक बाळासाहेब भांडे, शिवसहकार सेना तालुका संघटक ज्ञानेश्वर डफळ, युवासेना तालुकाधिकारी संतोष तोंडे, महिला आघाडी तालुका संघटीका ज्योती चांदेरे, रासप तालुकाध्यक्ष अतुल सुतार, भारतीय विद्यार्थी सेनेचे उपजिल्हा संघटक नवनाथ भेगडे, दिपक करंजावणे, दिलिप गुरव, सचिन तापकीर आणि विविध पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासनाला या मागणीचे निवेदनही आंदोलनकर्त्यांनी दिले आहे.

पहा व्हिडीओ :

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here