कोराईगड येथे दरीत अडकलेल्या भुगावच्या युवकाला वाचवण्यात यश

0
3192

स्वराज्यनामा ऑनलाईन :  लोणावळ्याजवळील कोराईगड किल्ल्यावरून तोल जाऊन दरीत गेलेल्या युवकास आज रेस्क्यू टीम, पोलिसांच्या तत्परतेने वाचवण्यात यश आले. जखमी अवस्थेत हा युवक मात्र सुखरूप रित्या रेस्क्यू करण्यात यश आल्याने बचावकार्यात सहभागी झालेल्यांचे कौतुक होत आहे.

               पुणे ग्रामीण पोलिसांच्या नियंत्रण कक्षाकडून पौड पोलिसांना आज माहिती मिळाली की, पौड पोलीस स्टेशन हद्दीतील कोराईगड येथे एक व्यक्ति किल्ला पाहताना घसरून खोल दरीत पडला आहे. राहुल दुधाने (वय 37 वर्ष) रा. भुगाव, ता.मुळशी, जिल्हा पुणे हा किल्ले कोराईगड, आंबवणे, ता. मुळशी, जि. पुणे येथे किल्ला पाहण्यासाठी गेला होता. तो बुरुजावरुन तोल जाऊन खाली दरीत पडला व मध्येच अडकला. तो जखमी झाला असून त्यानेच याबाबत त्याच्या मोबाईल वरून नियंत्रण कक्षास कळविले होते.

              सदरची माहिती मिळाल्याने या ठिकाणी पौड पोलिसांचे कर्मचारी, पोलीस पाटील आंबवणे व ॲम्बी व्हॅली रेस्क्यू टीम आंबवणे हे घटनास्थळी लागलीच दाखल झाले. त्यांच्या मदतीने दुधाने यांस यशस्वीरित्या बाहेर काढले. तो जखमी झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आल्याची माहिती पौड पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ यांनी दिली.

               रेस्क्यू टीमचे अक्षय शर्मा, डॉ.राजेश, रुपेश दळवी, गणेश दळवी पोलिस पाटील आंबवणे, पेठ शहापूर पोलिस पाटील किसन कराळे, उदय सुर्वे, राजू तोंडे, पोलिस संजय सुपे, नंदूशेठ वाळूंज हे या मदत कार्यात सहभागी झाले होते. घटनेची सर्वप्रथम माहिती पोलिस पाटील दळवी यांना मिळताच ते सदर युवकाच्या मोबाईलवर संपर्क साधत होते. युवकाकडून प्रतिसाद मिळाल्यानंतर त्याला धीर देऊन वाचवण्यासाठी आल्याचे दळवी यांनी सांगितले. रेस्क्यू टीम येईपर्यंत जखमी युवकाला दळवी यांनी धीर दिला. आंबवणे गावचे नेते नंदुशेठ वाळुंज हे सुद्धा बचावकार्याची माहिती वेळोवेळी घेत होते, त्यांनीही काही तरूणांना या बचावकार्यासाठी पाठवले होते, अशी माहिती गणेश दळवी यांनी दिली आहे.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here