तंबाखूमुक्तीच्या शपथेसह विविध उपक्रमांनी भोरमध्ये बालदिन साजरा

0
419

स्वराज्यनामा ऑनलाईन (भोर प्रतिनिधी) : तंबाखू मुक्तीच्या शपथेसह भोर तालुक्यात बालदिना विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अशोक गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दिनांक 14) रोजी बालदिनानिमित्त जिल्हा परिषद शाळांत विविध उपक्रम राबवले.

             भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. शाळेत या दिवसापासून तंबाखूमुक्त सशक्त पालक या अभियानाला सुरुवात करण्यात आली. महात्मा गांधीजींच्या जयंती निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने तंबाखू मुक्ती साठी शपथ देण्यात आली. यासाठी विद्यार्थ्यांनीही मोठा पुढाकार घेतला या उपक्रमाला प्रतिसाद दिला.

             काही शाळांत विद्यार्थ्यांना मिठाई वाटून व केक कापून बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम पंडित नेहरूजी यांच्या प्रतिमेचे विद्यार्थी व शिक्षकांच्या हस्ते पूजन करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळंदे येथील शाळेत चित्रकला, रांगोळी, रंगभरण, वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुलांना चॉकलेट वाटून बालदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या व तंबाखू मुक्तीची शपथ देखील देण्यात आली.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here