पिरंगुटच्या बालचमुंसाठी रस्ता सुरक्षा प्रशिक्षण उत्साहात संपन्न

0
369

स्वराज्यनामा ऑनलाईन :  पिरंगुट(ता.मुळशी) येथील टीआरडब्लू सन स्टिअरिंग व्हील्स या कंपनीच्या झेडएफसेफ्टीबनी कॅम्पेतर्फे बालचमूंसाठी रस्ता वाहतूक नियम, सुरक्षा व दक्षता आदीबाबतचे आनंददायी प्रशिक्षण उत्साहात संपन्न झाले.

               शिवसेनेच्या जिल्हा संघटिका संगीता पवळे यांच्या पुढाकाराने पिंरगुट येथील सुरभी हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात संस्कार इंग्लिश मिडीयम स्कूल व विद्याभवन स्कूल या दोन शाळांमधील अडीचशे विद्यार्थी सहभागी झाले होते.  कॅम्पेनचे मानव संसाधन व्यवस्थापक अरविंद येरोकर यांनी संयोजन केले होते. या वेळी कंपनीच्या प्रतिनिधी हरलीन कौर, शिवसेना मुळशी महिला आघाडीच्या पदाधिकारी ज्योती चांदेरे, संतोषी मारणे, प्रितम बांदल, शुभांगी पळसकर, शोभा सावरकर, दैवशाली पवळे, सुरेखा पवळे, आशा पवळे, मनीषा उभे, कावेरी साठे, करुणा कालेकर, मुख्यध्यापिका स्नेहा साठे, मुख्यध्यापिका सुचित्रा साठे उपस्थित होते.

               बसमध्ये रांगेतच चढणे, उतरणे, वाहतुकीची चिन्हे समजणे, सीट बेल्ट लावणे, झेब्रा क्रॉसिंग, चालताना पदपथाचा वापर आदी गोष्टींबाबत विद्याथ्यांना माहिती देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षेचे महत्व व त्याची अंमलबजावणी कशी करावी हे समजले. विद्यार्थ्यांची सुरक्षितता खुप महत्वाची असल्याने त्यांची काळजी अतिशय सावधगिरीनेे घेणे महत्वाचे आहे.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here