शैक्षणिक साहित्य वाटून शिक्षक दाम्पत्याने कन्येचा वाढदिवस केला साजरा

0
484

स्वराज्यनामा ऑनलाईन : शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून 3 वर्षाच्या मुलीचा वाढदिवस शिक्षक दाम्पत्याने साजरा केला. आदर्शवत आणि आगळा वेगळा असा उपक्रम सुतारवाडी. ता.मुळशी येथील शाळेत प्रमोद चवरे व अश्विनी चवरे या दाम्पत्याने राबवला आहे.

                 समाजात राहत असताना आपण समाजाचे काही देणे लागतो. खुप नाही पण थोडंसं का होईना ऋण फेडायचा प्रयत्न आपल्या कृतीतून आपण केला पाहिजे असा संदेश देत शिक्षक असलेलं चवरे दाम्पत्य सलग तिसर्‍या वर्षी आपली कन्या वीरा हिचा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्ताने यावर्षी स्वतः अध्यापनास असलेल्या सुतारवाडी, ता.मुळशी येथील जिल्हा परिषद शाळेत 11 नोव्हेंबर रोजी 10 हजार रूपये खर्चाचे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना वाटण्यात आले. 312 विद्यार्थ्यांना या शैक्षणिक साहित्यातून शिक्षणाची आवड आणि समाजाप्रति आदर निर्माण होण्यास मदत होणार आहे.

                 छोट्या वीराला या शाळेतीला दादा आणि दीदींबरोबर वाढदिवस साजरा करताना मोठा आनंद झाला नसेलच तर नवल.यावेळी शाळेतील शिक्षकांसह विविध मान्यवर उपस्थित होते. प्रमोद नारायण चवरे आणि अश्‍विनी चवरे या दाम्पत्याचा आदर्श घ्यावा तितका कमीच असल्याची उपस्थितांनी दाद देत या दोघांचे अभिनंदन आणि कौतुकही केले.

                 मुळशी तालुक्यात चवरे दाम्पत्य मागील नऊ वर्षापासून कार्यरत आहेत. सुतारवाडी शाळेत ते दोघेही मागील वर्षी बदलीने रुजू झाले. त्यांच्या या उपक्रमात त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य देखील त्यांना मोलाचे सहकार्य करतात. प्रत्येक दाम्पत्याने आपल्या मुलांचा वाढदिवस याप्रकारे साजरा केला तर नक्कीच आपण एक आदर्श व सुसंस्कृत पिढी घडवू शकू, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here