५० हजारांची लाच मागणाऱ्या तलाठ्यास सुसमध्ये ठोकल्या बेड्या

0
2817

स्वराज्यनामा ऑनलाईन :  खरेदी केलेल्या जमिनीच्या सात बारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी ५० हजारांची लाच मागणाऱ्या तलाठ्यास रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सचिन तुकाराम जाधव असे या तलाठ्याचे नाव असून सुस, ता.मुळशी येथे तो कार्यरत होता.

                 सुस, ता.मुळशी येथे 20 गुंठे जागा खरेदी व त्याव्यतिरिक्त अजुन काही जागा खरेदी करणारास त्याची नोंद करून देण्याचा मोबदला म्हणून 70 हजार रूपये रक्कम तक्रारदाराकडे करण्यात आली होती. तडजोडी अंती 50 हजार रोख रक्कम देण्याचे तक्रारदाराने मान्य केले होते. तक्रारदाराने तक्रार दिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुस येथील तलाठी कार्यालयामध्ये सापळा रचला होता. त्यानुसार आरोपी सचिन तुकाराम जाधव (वय 29) याने लाच स्विकारल्यानंतर त्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यानंतर त्याला हिंजवडी पोलिस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जात आहे.

                 मुळशी तालुक्यात जमिनीला सोन्याचे भाव आलेत. त्यामुळे किरकोळ कामासाठी लाखो, हजारोंची लाच घेणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. १ कोटी रुपायांची लाच घेणारे तहसीलदार मुळशी तालुक्यात पकडलेले प्रकरण विझले नसतानाच भुगाव च्या तलाठ्यांना लाच घेताना पकडले होते. आणि आता पुणे व पिंपरी शहराच्या मध्यभागी असलेल्या मुळशी तालुक्यातील सुस गावातल्या तलाठ्याने लाच घेताना रंगेहाथ सापडला आहे. यांना कशाचीच तमा नसल्याचे दिसत असून अशा अनेक माशांना पकडण्यासाठी सजग नागरीकांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.

               ही कारवाई मा.पोलिस उपायुक्त/पोलिस अधिक्षक श्री.राजेश बनसोडे व मा.अप्पर पोलिस अधिक्षक श्री.संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे. शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास नागरीकांनी खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक राजेंद्र बनसोडे यांनी केले आहे.

हेल्पलाईन टोल फ्री क्र.   : 1064

अ‍ॅंटी करप्शन ब्युरो, पुणे : 020 – 26122134, 26132802, 26050423

व्हॉट्स अप, पुणे : 7875333333

व्हॉट्स अप, मुंबई : 9930997700

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here