पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे वार्षिक पंच शिबिर उत्साहात

0
469

स्वराज्यनामा ऑनलाईन : पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे वार्षिक पंच शिबीर उत्साहात पार पडले. राजर्षी शाहू कॉलेज, लक्ष्मीनगर, पर्वती, पुणे या ठिकाणी सन २०१९-२० या वर्षाच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सर्व आजी-माजी व नवीन पंच या शिबिरास उपस्थित होते.

              यावेळी पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन कार्याध्यक्ष वासंती सातव, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन उपाध्यक्ष पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन उपाध्यक्ष शकुंतला खटावकर, सहकार्यवाहक शिल्पा भोसले, सहकार्यवाहक राजेंद्र आंदेकर, महाराष्ट्र राज्य पंच कबड्डी सेक्रेटरी दता झुंजूंर्डे, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन सदस्य  प्रकाश बालवडकर, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन प्रशिक्षक समिती सदस्य भरत शिळीमकर, सहकार्यवाहक योगेश यादव, पुणे जिल्हा पंच सेक्रेटरी संदिप पायगुडे, भाऊसाहेब करपे, सहकार्यवाहक मधूकर नलावडे, अनिल जोशी, क्रिडा साहित्य व्यवस्थापक प्रमुख अनिल यादव, खजिनदार योगीराज टकले, धनश्री जोशी, कविता आल्हाट इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

              सन २०१७ ते २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या पंच परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व केंद्रातील भोर बारामती खेड पुणे शहरातील सर्व पंच व जुने पंच यांना मार्गदर्शनपर हे वार्षिक शिबीर आयोजित केले होते. या शिबीराचे संयोजक धर्मवीर कबड्डी संघ बालेवाडी संघातील अध्यक्ष प्रकाश बालवडकर यांनी केले होते. या कार्यक्रमाला उपस्थित नामांकित व्यक्ते सन्मानिय राजेंद्र भिडे सर यांनी सर्व उपस्थित पदाधिकारी, खेळाडू, पंच यांना मार्गदर्शन केले. मेडिटेशन करून घेऊन पंचांनी आपले मनोगत कसे वाढवावे मैदानावर ताबा कसा घेतला जातो, मैदानावर कसे उभे राहिले पाहिजे, गणवेश कसा असावा, याची माहिती दिली.

              ज्याला खेळता येत नाही तो पंच होते आणि ज्याला खेळाडू आणि पंच होता येत नाही तो मार्गदर्शक होतो. माझ्या अंगावर रिफ्रीचा कोट आहे आणि मी मैदानावर न्यायाधीश आहे हे लक्षात घेऊन नियमानुसार कारवाई केली पाहिजे. योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. पंच परिक्षेत जे शिकविले जाईल त्यांच्या पलीकडे जाऊन पंचांनी अभ्यास केला पाहिजे, नियमावली वाचन पाहिजे. कबड्डीचा दर्जा जर वाढवायचा असेल तर पंच हा योग्य निर्णय देणारा असावा. तेव्हा कबड्डीचा दर्जा चांगला होईल. जर पंचांनी निर्णय चुकीचा दिला तर कबड्डी संपुष्टात येण्यास वेळ लागणार नाही, असे सांगितले. यावेळी सर्व खेळाडू पदाधिकारी यांच्या कडून प्राणायाम करून घेतल्याने त्यांचे मनोबल वाढले गेले आणि कबड्डी विषयावर विविध चर्चा करण्यात आली.

              यावेळी सुर्यकांत मुटके यांनी कबड्डी नियमावली पुस्तक वाचन केले तर राजेंद्र आंदेकर यांनी नियमावली स्पटीकरण करून समजावून सांगितले. भरत शिळीमकर यांनी शंकेचे निरसन केले. योगेश यादव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत खुल्या चर्चासत्राबद्दलच्या शंकेचे निरसन केले. भाऊसाहेब करपे यांनी आभार मानले.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here