मुळशी तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिसांचे नागरिकांना सहकार्याचे आवाहन

0
470

स्वराज्यनामा ऑनलाईन :

पौड : प्रतिनिधी 

पौड (ता.मुळशी ) पोलिस स्टेशनच्या वतीने मुळशी तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला तालुक्यातील हिंदू – मुस्लीम बांधव, पोलिस पाटील उपस्थित होते. 

      सर्वोच्च न्यायालयाकडून रामजन्म भुमी तसेच बाबरी मशीद या संवेदनशील विषयावर पुढील काही दिवसांत अंतिम न्याय निवाडा होण्याची शक्यता आहे. तसेच रविवार (दि.१०) रोजी ईद ए मिलाद हा सण सुध्दा सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने पौड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  यात कोणत्याही धर्माच्या भावना दुखविल्या जातील तसेच चुकीच्या प्रतिक्रिया व्हाँट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून कोणीही करू नये. न्यायालयाच्या निर्णयावर टिप्पणी करून न्यायालयाच्या निर्णयाचा कोणीही अवमान करू नये अशा विविध सूचना यावेळी देण्यात आल्या.
      यावेळी जिल्हा परिषदेचे माजी गटनेते शांताराम इंगवले, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष अमराळे, पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पवळे, तुकाराम टेमघरे,संजय पिंगळे, पोपट दुडे, काशिनाथ शिंदे, शब्बीर आत्तार, दस्तगीर आत्तार, शहनाज शेख, पोलिस नाईक संजय सुपे तसेच नागरिक उपस्थित होते.

 तेढ निर्माण करणारावर कारवाई करणार : अशोक धुमाळ,पौड पोलिस निरीक्षक

        रामजन्म भूमी तसेच बाबरी मशीदचा सर्वोच्च न्यायालयात असलेल्या न्यायनिवाडावर पुढील काही दिवसांत निर्णय येईल. यानंतर  सामाजिक सलोखा बिघडून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यावर, सोशल मिडीयावर चुकीचा मेसेज टाकणारावर तसेच कायदा सुव्यवस्था भंग करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पौड पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी सांगितले.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here