सोनेरी मुळशी मित्र परिवाराकडून ५१ हजारांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत

0
1022

स्वराज्यनामा ऑनलाईन :  मुळशी तालुक्यातील “सोनेरी मुळशी मित्र परिवार” व्हॉट्स ॲप ग्रुपच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५१ हजार रूपयांची मदत करण्यात आली. मदतीचा धनादेश मुळशीचे तहसिलदार अभय चव्हाण यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला आहे.

              ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महापूर आला होता. महापुराच्या भयंकर प्रलयानंतर या दोन्ही जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होऊन जीवितहानी झाली होती. या दुर्देवी दुर्घटनेनंतर सांगली व कोल्हापूर येथे मोठी मदत नागरिकांनी जमा करून पाठवली होती. याच माणूसकीच्या भावनेतून मुळशी तालुक्यात अग्रेसर असलेल्या “सोनेरी मुळशी मित्र परिवार” या व्हॉट्स ॲप ग्रुपने सदस्यांना मदतीचे आवाहन केले आणि बघताबघता एक लाख रूपयांहून अधिक रक्कम माणूसकीच्या भावनेतून जमा झाली. यातील ५१ हजार रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा धनादेश तहसिलदार अभय चव्हाण यांनी स्विकारला आहे.

              यावेळी सोनेरी मुळशी मित्र परिवार ग्रुपचे ॲडमीन व दैनिक पुढारीचे पत्रकार दिपक सोनवणे, मुळशी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद माझिरे, सकाळचे उपसंपादक निलेश शेंडे, कार्याध्यक्ष प्रविण सातव, सचिव विजय वरखडे, सरचिटणीस गोरख माझिरे, जितेंद्र इंगवले, दिपक आबा करंजावणे, सतिश सुतार, माऊली डफळ, मोहन शिंदे, संतोषदादा पवळे, रामदास मानकर, सागर धुमाळ, अमित कुडले, मधुर दाभाडे, किशोर देशमुख, गणेश शिर्के, शिवाजी येनपुरे, विपूल गुजराथी, विराज गुजराथी, बाबासाहेब पारखी तसेच मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

सोनेरी मुळशी मित्र परिवार समाजकार्यात अग्रेसर

              मुळशी तालुक्यातील सर्वच नामवंतांचा असलेला हा सोनेरी मुळशी मित्र परिवार समाजकार्यात तितकाच अग्रेसर आहे. समाजातील गरजवंतांना या माध्यमातून मदत केली गेली आहे. यापुर्वी असंच एका वृत्तपत्र विक्रेत्याला अपघाताचा सामना करावा लागला होता. परिस्थिती पाहता त्यांना उपचारासाठी अनेक अडचणी येत होत्या. सोनेरी मुळशी मित्र परिवाराच्या वतीने असेच ग्रुपवर आवाहन केल्यानंतर जमलेली रक्कम त्या विक्रेत्याच्या उपचारासाठी प्रदान करण्यात आली. फुल न फुलाची पाकळीची मदत केल्याचा आनंदही परिवाराच्या सदस्यांमध्ये निर्माण झालेला. त्या कुटूंबियांच्या चेहर्यावर समाधान व्यक्त झाले होते. असाच खारीचा वाटा परिवार उचलत राहणार असल्याची भावना त्यावेळी सदस्यांनी बोलून दाखवलेली. त्याच भावनेतून ही पूरग्रस्तांसाठी मदत गोळा झाली, ती आज सुपूर्द करण्यात आली.

              व्हॉट्स ॲप ग्रुप केवळ सोशली व्यक्त होण्यापेक्षा कृतीतून व्यक्त होणारे माध्यम होणे हे नक्कीच आल्हाददायक आणि आशादायक चित्र आहे. सोशल मिडीया हे आभासी माध्यम असले तरीही त्यातून एकत्र येत सामाजिक कृतीतून समाजाप्रती उतराई होण्याचं आदर्श काम सोनेरी मुळशी मित्र परिवार करत आहेत. शासकीय अधिकारी, पोलिस, पत्रकार, विविध पुढारी, सरपंच तसेच अनेक क्षेत्रात काम करणारे नामवंत मुळशीकर यामध्ये सहभागी आहेत. एखाद्या पक्षाचं, संघटनेचं मुखपत्र जसं असतं तसंच तालुक्याचं मुखपत्रासारखं काम या व्हॉट्स ॲप ग्रुपच्या माध्यमातून होताना दिसत आहे. याचा आदर्श समाजातील अनेकांनी घ्यावा, हीच अपेक्षा.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here