मुळशी उपसभापती ओझरकर व तरूणांनी केल्या आमदारांकडे विविध मागण्या

0
1928

स्वराज्यनामा ऑनलाईन :  मुळशी उपसभापती पांडुरंग ओझरकर यांसह ईतर तरूणांनी आमदार संग्राम थोपटे यांच्याकडे विविध मागण्या केल्या आहेत. सलग तिसर्यांदा निवडून आल्याबद्दल थोपटे यांचा ओझरकर व तरूणांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मुळशीतील विविध समस्या सोडवण्यासाठी आमदारांना साकडे घालण्यात आले.

              या सत्कारासाठी मुळशीचे उपसभापती पांडुरंग ओझरकर, जीवन पारखी, सागर शितोळे, विश्वास जांभूळकर, युवक कॉंग्रेस मुळशी तालुका अध्यक्ष सुहास भोते आदी उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील विविध समस्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली. त्या सोडवण्याचे थोपटे यांनी आश्वासनही दिले आहे. तसेच खड्डे बुजवण्यासाठी संबंधित अधिकार्यांना तत्पर फोन करून कार्यवाही करण्याचेही आदेश दिले आहेत.

              मुळशीतील घोटवडे ते आंधळे रस्ता, नेरे ते कासारसाई रस्ता तयार करणे, मेट्रोला माण-हिंजवडी मेट्रो हे नाव देणे, माण येथील स्थानिक टपरी धारकांना जागा उपलब्ध करुन दयावी. माण-हिंजवडी आयटी पार्क मध्ये स्थानिकांना नोकरी व व्यावसाय मिळावा. त्याचप्रमाणे तालुक्यातील कंपन्यांचा शेष राखीव फंड तालुक्याला मिळावा, या साठी प्रयत्न करावा या मागण्या करण्यात आल्या. आमदार थोपटे यांनी लगेच फोनवरून रस्त्याच्या कंत्राट दाराला त्वरित रस्त्याचे काम चालू करून खड्डे बुजविण्याचे आदेश दिले व लवकरात लवकर एमआयडीसी व पीएमआरडी यांची भेट घेऊन, त्यांच्याशा चर्चा करून मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन दिले आहे.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here