लहानग्या कबड्डीपटूंनी आदिवासी विद्यार्थ्यांसोबत साजरी केली दिवाळी

0
663

स्वराज्यनामा ऑनलाईन :  कोंढावळे (कळमशेत), ता.मुळशी येथील आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. कोथरूड मधील श्री बालाजी प्रतिष्ठाण कबड्डी संघातील खेळाडू मुले आणि मुलींनी या वाटपाचे आयोजन केले होते. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन प्रशिक्षक समिती सदस्य, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन सदस्य, श्री बालाजी प्रतिष्ठाण कबड्डी संघ प्रशिक्षक, कबड्डी महर्षी, बेलावडे गावचे सुपुत्र भरत शिळीमकर यांच्या वाढदिवसा निमित्त दिवाळीच्या उपयुक्त वस्तू, दिवाळी फराळ, खाऊ आणि नाष्टा वाटप करण्यात आला.

               यावेळी श्री बालाजी प्रतिष्ठाण कबड्डी संघ व तळजाई माता प्रतिष्ठाण कबड्डी संघ कोथरूड पुणे या संघातील खेळाडू उपस्थित होते. भुगावचे उद्योजक नारायण शेडगे,  कबड्डी संघाचे प्रशिक्षक पप्पूदादा कंधारे, अभिजित चव्हाण, किरण थरकुडे, चिन्मय शिळीमकर, तेजेस शिळीमकर, भुषण शेडगे, कुमार शिंदे, सोन्या जानकर, संतोष वाळंज, अक्षय वाळंज, प्रसन्न कंधारे, यश चव्हाण, वैष्णवी मारणे, स्नेहल गोपालघरे, पायल फाले, सानिया कंधारे, सायली शिंदे, ॠतुजा शिंदे, उर्वशी गोपालघरे, वस्तीवरील सर्व ग्रामस्थं उपस्थित होते.

               श्री बालाजी प्रतिष्ठाण कबड्डी संघातील मुले मुली पालक हे भारतीय संस्कृतीची जोपासना करण्यासाठी कबड्डीच्या पलीकडे जाऊन होणारे  प्रत्येक जण हे साजरे केले जातात. अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जातात. हि संस्था पुणे येथील वनात परिवार शाळा या ठिकाणी रोज संध्याकाळी ०६:०० ते ०९:०० या वेळात कबड्डी सराव करत आहेत. या क्लब मध्ये साधारण पणे १५० ते २०० मुले मुली आहेत. कार्यक्रमाचे नियोजन प्रदिप पाटील व सचिन आकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here