मुळशीत एकता दौड व राष्ट्रीय एकतेच्या शपथेने लोहपुरूष पटेल यांची जयंती साजरी

0
468

स्वराज्यनामा ऑनलाईन  : लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती पौड, ता.मुळशी येथे उत्साहात साजरी करण्यात आली. पौड पोलिस स्टेशन व पंचायत समिती, ता.मुळशी यांच्या संयुक्त विद्यमाने जयंतीनिमित्त “एकता दौड” चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शिवाजी विद्यालय, पौड येथील विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला होता.

              राष्ट्रिय एकता दिनानिमित्त पौड एस. टी. स्टॅन्ड ते पौड पोलीस स्टेशन दरम्यान “एकता दौड” आयोजित करण्यात आली होती. या दौड मध्ये पोलिस स्टेशन चे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच पंचायत समिती पौड चे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच शिवाजी विद्यालय पौड येथील विद्यार्थ्यांनी भाग घेतला. मा. सरदार वल्लभभाई पटेल यांचे प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करण्यात आले. दौड झाल्यानंतर उपस्थित सर्वांनी”राष्ट्रीय एकतेची” शपथ घेतली.

              पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेलार, शिक्षणाधिकारी माणिक बांगर, पोलिस उपनिरीक्षक अनिल लवटे, श्रीकांत जाधव, पोलिस हवालदार शंकर नवले, पोलिस नाईक संजय सुपे, केंद्रप्रमुख मधुकर येणपुरे, सर्व पोलिस कर्मचारी, शाळेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. गटविकास अधिकारी शेलार साहेब आणि पौड पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवण्यात आल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक लवटे यांनी दिली.

राष्ट्रिय एकतेची शपथ घेताना पौड पोलिस स्टेशनचे सर्व कर्मचारी, पंचायत समितीचे अधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here