भोर विधानसभा मतदारसंघातून आघाडीचे संग्राम थोपटे विजयी

0
2606

स्वराज्यनामा ऑनलाईन : २०३ भोर विधानसभेसाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत संग्राम अनंतराव थोपटे यांचा विजय झाला आहे. शिवसेनेच्या कुलदीप कोंडे यांच्यावर त्यांनी मात दिली आहे. कॉंग्रेसच्या तिकीटावर सलग तिसर्यांदा निवडून येत हॅटट्रिक साधणारे संग्राम थोपटे पुणे जिल्ह्यातील प्रभावी नेते ठरले आहेत.

             आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांना एकुण १ लाख ८ हजार ९२५ मते मिळाली तर युतीच्या कुलदीप कोंडे यांनी शेवटपर्यंत घासून टक्कर देत एकुण ९९,७१९ एवढी मतं मिळवली. ९ हजार २०६ मतांनी थोपटे यांनी विजय मिळवला आहे.

            मुळशी तालुक्यातून सुरवातीला शिवसेनेच्या कुलदीप कोंडे यांनी दीड हजार मतांची आघाडी घेत विजयाकडे वाटचाल सुरू केली होती. वेल्हे तालुक्यातही त्यांनी थोपटे यांना चांगलं आव्हान देत आपली घौडदौड कायम ठेवत बरोबरीने स्कोअर बोर्ड हलता ठेवला. शिवसैनिकांनी मोठ्या आत्मविश्वासाने कुलदीप कोंडेना साथ दिल्याचे दिसून आले. य़ुतीची ताकदही यानिमित्ताने भोर विधानसभेत दिसून आली.

            मतदारसंघातील ईतिहास पाहता ही लढत संग्राम थोपटे यांना फारच अवघड गेल्याचे दिसून आले आहे. सलग दोनवेळा निवडून आलेल्या संग्राम थोपटेंना शिवसेनेच्या कुलदीप कोंडेंनी कडवी झुंज दिली. शेवटच्या काहीच फेरी शिल्लक असेपर्यंत कोंडे हे विजयी होतील अशी आशा लागून राहिली होती. मात्र शेवटच्या पेट्या म्हणजे थोपटेंच्या हक्काच्या मतदारांच्या असल्याने कोंडे यांनी ती कोंडी एवढी फोडणे जमले नाही. तरीपण कोंडे यांच्या या लढ्याची मात्र चर्चा मतदारसंघात निश्चितच होईल, यात वाद नाही.

२०३ भोर मतदारसंघात आघाडीच्या संग्राम थोपटे यांनी विजय मिळवल्यानंतर कार्यकर्त्यांनी केलेला विजयी जल्लोष

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here