मुळशीत ढगफुटीसदृश्य पाऊस, रिहे-पडळघरवाडीत घातलं थैमान

0
3832

स्वराज्यनामा ऑनलाईन : पडळघरवाडी, रिहे, ता.मुळशी येथे ढगफुटीसदृश्य पावसाने आज थैमान घातले. रस्त्यावरून प्रचंड पाण्याचे लोट वाहत होते. तर घराघरांमध्ये पाणीही घुसले आहे. भयंकर अशी परिस्थिती निर्माण झाल्याने गावकर्यांमध्ये चिंतेच वातावरण पसरले होते.

           आज संध्याकाळी 5 च्या सुमारास रिहे गावातील पडळघरवाडी येथे जोरदार गडगडाटी वार्यासह पाऊस झाला. या पावसाने भयानक रौद्ररूप धारण केले होते. रस्त्यावरून नदीसारखं पाणी प्रचंड वेगात वाहत होतं. हे पाणी शेतांमध्ये आणि घरांमध्येही घुसलं. त्याचं प्रमाण इतकं भयंकर होतं की गावकरी जीव मुठीत घेऊन बसले होते. ग्रामस्थांना जीवाचा धोका वाटू लागला होता. कसाबसा गावकर्यांनी हा रौद्रप्रताप पाहिला. अख्ख्या आयुष्यात असला प्रकार कधी पाहिला नव्हता असं ग्रामस्थांनी सांगितलं.

           ढगफुटीसदृश्य पावसाचं पाणी शेतात घुसल्याने भातपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. 70 टक्के शेती नुकसानीत गेली आहे. शेतांचे बांध फुटले आहेत, त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास नुसता हिरावून नाही नेला तर शेतांचं नुकसान करून पावसाने शेतकर्यांच्या हातापोटावर लाथ मारल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीची दखल घेऊन शासनाने त्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे.

आणखी व्हिडीओ पहा :

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here