मध्य प्रदेशातील खतरनाक गुन्हेगार सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने गुजरातचे तत्कालिन गृहमंत्री अमित शहा, माजी पोलीस प्रमुख पी. सी. पांडे आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी डी. जी. वंजारा यांच्यासह ३८ जणांना आरोपी बनविण्यात आले होते. २३ जुलै २०१० रोजी सीबीआयने अमित शहा यांच्यावर दोषारोपपत्र दाखल केले. त्यामुळे २४ जुलै रोजी अमित शहा यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शहा यांना तब्बल तीन महिने साबरमती कारागृहात कारावास भोगावा लागला होता. त्याचबरोबर गुजरातमधून दोन वर्षे तडीपारीही भोगावी लागली होती. यावेळी संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडी सरकारमध्ये पी. चिदंबरम हे गृहमंत्री होते. यामुळे अमित शहा यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आली होती. येथूनच कॉँग्रेस आणि विशेषत: पी. चिदंबरम यांच्याशी अमित शहा यांची खुन्नस सुरू झाली होती.