भोरमध्ये मतदानाची टक्केवारी घटली, उमेदवारांना चिंता

0
1421

पिरंगुट,ता.मुळशी येथे मतदानास आलेल्या ज्येष्ठ महिला व घोटवडे येथे व्हीलचेअर वर बसून मतदान केलेले शिवाजी भेगडे.

स्वराज्यनामा ऑनलाईन : २०३ भोर विधानसभेसाठी मुळशी तालुक्यात आज सर्वत्र उत्साहात मतदान पार पडले आहे. मात्र मतदानाची टक्केवारी घटल्याने उमेदवारांची चिंता वाढली आहे. पावसाने दिवसभर उघडीप दिल्याने मतदान वाढेल असा अंदाज असताना मात्र तसे घडले नाही. भोर विधानसभेसाठी एकुण ६२.९३ टक्के मतदान केल्याची माहिती मिळाली आहे.

            मुळशी तालुक्यात आज मतदानासाठी सकाळ सकाळी चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र दुपारनंतर मतदानास येणार्या लोकांची संख्या रोडावली. रोज पडणारा पाऊस आज पुन्हा येणार या अपेक्षेमुळे शहरात राहणार्या मंडळींनी गावाला मतदान करायला न येण्याचे पसंद केले असावे, त्यामुळेही मतदान घटले असावे, असा अंदाज आहे. तर पुर्व पट्ट्याच्या शहरी भागातही मतदानाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. शनिवार आणि रविवारची सुट्टी लागून आल्याने, मतदानाचा सोमवारचा दिवसही सुट्टी असल्याने शहरी भागातली लाेकं फिरकली नसल्याचे बोलले जातेय.

            अनेक ठिकाणी कर्मचार्यांची थोडीशी धांदल उडाली. काल जोरदार पाऊस झाल्याने मतदान साहित्य मतदान केंद्रावर घेऊन जाताना त्रेधातिरपीट उडालेली. त्यामुळे वैतागलेल्या कर्मचार्यांना त्रास सहन करावा लागला. आज मतदानाच्या दिवशी काही काही मतदान केंद्रांवर उमेदवारांचे छायाचित्र न अनुक्रमांक आणि चिन्ह असलेली यादी लावली नसल्याचे दिसून आले. ते लक्षात आणून देता ती चूक दुरूस्त केली गेली.

            मतदानासाठी विशेष सखी केंद्र, अपंगांसाठी व्हीलचेअरची सोय करण्यात आली होती. यावेळी सीआरपीएफ जवानही जैनात करण्यात आल्याचे दिसून आले. मुळशी तालुक्यात मतदानासाठी चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती.

आदर्शगाव अंबडवेट, ता.मुळशी येथील ग्रामस्थांनी एकत्र येत मोठ्या उत्साहात मतदान केले.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here