गावठी पिस्टल बाळगणारास पौड पोलिसांनी केली अटक

0
3572

स्वराज्यनामा ऑनलाईन : गावठी पिस्टल कमरेला बाळगून फिरणारास मुळशी तालुक्यातील पौड पोलिसांनी आज अटक केले. यासाठी पौड पोलिसांनी पौड एस. टी. स्टॅंड परिसरात मिळालेल्या गुप्त बातमीनुसार सापळा रचला होता. निवडणुकीच्या काळात ही कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.
             पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, त्यांना गुप्त माहिती मिळाल्यानुसार एक व्यक्ति कमरेला गावठी पिस्टल लावून एस.टी. स्टॅंड परिसरात फिरत होता. त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी नागेश मनोहर तांबेकर रा.भोईआळी, पौड, ता.मुळशी, जि.पुणे यांस अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक काळ्या रंगाची गावठी पिस्टल जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपी हा पौड पोलिस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरूद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत.
             पोलिस अधिक्षक संदिप पाटील, अप्पर पालिस अधिक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार निवडणुक काळात कारवाई पार पडत आहे. वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ, उपनिरिक्षक श्रीकांत जाधव, पोलिस हवालदार अब्दुल शेख, बाबा शिंदे, कांबळे, पोलिस नाईक रॉकी देवकाते, नितिन कदम, जय पवार, कॉनस्टेबल सुहास सातपुते, विनोद चोबे, प्रशांत बुनगे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here