पिंपरीत येथील’अ’ क्षेत्रीय कार्यालयावर शिवसेनेचा ” हंडा मोर्चा ”

0
202

‘निगडी प्राधिकरणातील पाणीपुरवठा सुरळीत झालाच पाहिजे’, ‘पाणी कपात रद्द झालीच पाहिजे’, ‘शहरवासियांना शुद्ध पाणी मिळालेच पाहिजे’, ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’, ‘पाणी गळती थांबलीच पाहिजे’ असा जोरदार घोषणा देत शिवसेनेच्या वतीने आज गुरुवारी ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयावर ‘हंडा मोर्चा’ काढण्यात आला. 
शिवसेना नगरसेवक अमित गावडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बाळासाहेब वाल्हेकर, उपशहरप्रमुख अमोल निकम, पिंपरी विधानसभेच्या महिला संघटिका सरिता साने, समन्वयक भाविक देशमुख, विभागप्रमुख पार्थ गुरव, उपविभागप्रमुख विकास भिसे, महेश जाधव, शाखाप्रमुख शरद जगदाळे, दिपक कोटकर, त्रिभुवन मुल्ला, युवा अधिकारी  सागर पांढारकर, निलेश जांभळे, सचिन नागपुरे, अनुजा कुमार यांच्यासह शिवसैनिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयातील पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता दिपक कुंभार यांना पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले. 

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here