“संग्राम” नावाची ‘स्वतंत्र ओळख’ आणि ‘वलय’ निर्माण करणारा नेता

0
1295
“संग्राम” नावाची ‘स्वतंत्र ओळख’ निर्माण करणारा नेता

स्वराज्यनामा ऑनलाईन  :  तो आला, त्याने पाहिलं, त्याने जिंकून घेतलं सारं… असं आमदार संग्राम थोपटे यांच्याबद्दल बोलता येऊ शकतं. कोणी म्हणेल त्यांच्या घरातच राजकीय बाळकडू त्यांना मिळालं…. पण ते बाळकडू मिळालं असलं तरी आज स्वतंत्र वलय निर्माण करत एक यशस्वी राजकारणी आणि सक्षम नेता म्हणून स्थान प्राप्त करत त्या बाळकडूच्या रोपट्याचं वटवृक्षात रुपांतर केलं आहे.

               थोपटे या नावाला राजकीय क्षेत्रात पुर्वीपासूनच खुप मोठं वलंय आहे. ते आजतागायतही आहेच, यात शंका नाही, पण हे वलंय टीकवून ठेवून त्यात स्वतंत्र ओळख निर्माण करणं, हे ही शिवधनुष्य पेलण्यासारखंच होतं. ते लीलया संग्राम थोपटे यांनी पेलून उत्तम भुमिका पार पाडली आहे. राजकारणात उतरायच्या निर्णयानंतर पंचायत समितीमध्ये पहिलाच पराभव पचवलेल्या संग्राम यांनी थेट 2009 मध्ये आमदारकीचं मैदान मारून सगळ्यांना मोठा आश्चर्याचा धक्का दिला. तेव्हाच राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आणि यांच्यात काहीतरी विशेष चुणूक असल्याचे सर्वांनाच दाखवून दिले. शिवसेनेच्या विद्यमान आमदार असलेल्या शरद ढमाले या बलाढ्य आणि तगड्या उमेदवाराचा पराभव करून राजकीय घौडदौडीला सुरवात केली.

               सन 2009 मध्ये मतमोजणीवेळी सुरवातीला पिछाडीवर असलेला हा हाताचा पंजा चिन्ह असलेला उमेदवार मात्र शेवटच्या क्षणाला मात्र आघाडी घेत प्रतिस्पर्धी उमेदवारांचे विजयी मुद्रेकडे गेलेले चेहरे पार झाकोळून टाकत विजयी होता. हीच परंपरा सन 2014 सालीही त्यांनी कायम ठेवली आहे. मतमोजणी पुर्ण व्हायच्या आधीच प्रतिस्पर्धी उमेदवार सुरवातीपासून आघाडीवर असल्याने शेवटचे काही क्षण बाकी असताना एक वृत्तवाहिनी अंदाजाने प्रतिस्पर्धी उमेदवार विजयी झाले आहेत, अशी बातमी देते. पण मतमोजणी पुर्ण झाल्यावर निकाल मात्र संग्राम थोपटे यांच्या बाजूने लागतो, ही किमया नाही तर स्वतःच्या परिसरात असलेली मजबूत पकड बाजी पलटवते, हे अधोरेखित होते. त्यामुळे ही पकड थोपटे घराण्याची असली तरी कष्ट मात्र संग्राम नावाच्या व्यक्तिचेच आहेत.

               2009 मध्ये मुळशी तालुक्यात अगदी काही हजार मतं घेणारे संग्राम तालुक्यात बंडखोरीमुळे पक्ष संघटना विचलीत झाली असल्याने लक्ष केंद्रित करतात. संघटना पुन्हा बांधायला सुरवात करतात. बंडखोरी आणि त्यावर योग्य ते निर्णय घेऊन ते वादळ ही शमवतात. शमलेलं वादळ शांत होत नाहीत तोच पुन्हा पक्षातले एक सदस्य दुसर्या पक्षात प्रवेश करतात. अशा परिस्थितही मोलाची साथ देणारे कार्यकर्ते त्यांनी हेरून आणि बांधून ठेवलेले असतात, ही त्यांच्या चाणाक्ष राजकारणाची एक नीतीच म्हणायला हवी. ते कार्यकर्ते कुठेही न जाता संग्राम यांच्याच पाठीशी भक्कमपणे उभे राहतात, ही तर मावळा वंशजांची अचूक राजनीती पहायला मिळाली. तरूण आणि सजग तसेच कार्यकर्तृत्व कार्यकर्त्यांची बांधणी करून मुळशी तालुका पक्षासाठी पुन्हा पुर्वपदावर आणतात. या राजकीय यशस्वीतेचा एक भाग आहे.

Posted by स्वराज्यनामा on Thursday, 17 October 2019

               2014 च्या निवडणूकीत मोदी लाटेची मोठी त्सुनामी आली असताना नुसतं तग धरून नाही तर 20 हजारांच्या मोठ्या मताधिक्क्याने विजयी होऊन मोदी लाटेतही विरोधी पक्षातून निवडून येतात. हा तर त्यांच्या कार्यकुशलतेला जनता जनार्दनाने दिलेला कौलच म्हणावा लागेल. दुसर्यांदा आमदार होऊन राजकीय कसाची झलक त्यांनी इतर पक्षांना दाखवून दिलेली आहे. त्यावर ते न थांबता आता सलग तिसर्यांदा निवडून येण्यासाठी सज्ज झाले आहेत.

               मात्र त्यासाठी 2014 ला निवडून आल्यानंतर संग्राम यांनी मुळशी तालुक्यावर विशेष लक्ष केंद्रित केलेले दिसून येते. मैदान नुसते मारायचे नसते, तर ते कसे मारले हे ही दाखवून द्यायचे असते, असा चंग त्यांनी बांधला. त्यांनी मुळशीतील दुर्गम भागांना निधी देऊन आपल्या हितचिंतकांचं एक जाळं तयार केलं. नावानिशी कार्यकर्त्यांच्या घराचीही इत्थंभूत माहिती ठेवण्यास सुरवात केली. दुर्गम भागातील अनेक गावांची नावेही मुळशीतील नेत्यांना सलग सांगता यायची नाही.

               संग्राम थोपटे यांना नुसती गावांची नावंच नाही तर तिथले रस्त्यांची नावं, गावातील लोकांची नावं, लोकं हे तोंडपाठ असणं, हे राजकीय चुणूक असल्याचं दर्शवणारं आहे. ही त्यांनी जपलेली ओळख बरंच काही शिकवून जाणारी आहे. म्हणूनच वर म्हटलं आहे की, नुसतं मैदान मारायचं नसतं तर ते कसं मारलं हे ही दाखवून द्यायचं असतं. आणि थोपटे वलयातून स्वतंत्र ओळख निर्माण करणारे संग्राम भोरचा रणसंग्राम नुसता मारणार नाहीत तर तो कसा मारला हे ही दाखवून देतील यात शंकाच नाही.

काय आहेत संग्राम थोपटेंच्या उजव्या बाजू जाणून घेऊ

1. मतदार संघात गेल्या 5 वर्षात 541 कोटी रुपयांच्या विकास कामांसाठी निधी आणला आहे.

2. पीएमआरडीए अंतर्गत 4654 घरकुलांना मंजूरी. त्यात भोरकरांकडून उत्स्फुर्त प्रतिसादामुळे भोर पॅटर्न ची स्वतंत्र ओळख तयार केली.

 3. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून भोरसाठी 38 कोटी 12लाख, वेल्हे साठी 24 कोटी 56 लाख आणि मुळशीसाठी 40 कोटी 45 लाख मंजूर करवून घेतले.

4. विधानसभेत 93 टक्के उपस्थिती सून 984 प्रश्न व त्यापैकी 48 लक्षवेधी प्रश्नं विचारले आहेत.

इतर अनेक कामांचा डोंगर उभा केला आहे, मात्र त्यातली महत्वाची फक्त वर नमूद केली आहेत.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here