थोपटे मुळशीत विरोधी उमेदवारांना दाखवणार ईंगा, घेणार आघाडी?

0
1266

121 कोटींची विकासकामं ही मोठीच जमेची बाजू, आदर्श आमदार असल्याची पोचपावती

स्वराज्यनामा ऑनलाईन :   येत्या विधानसभेत भोर विधानसभेच्या उमेदवारांमध्ये आघाडीचे उमेदवार व विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांचे आव्हान संपवणे सध्या तरी शक्य नसल्याचे दिसत आहे. थोपटे हे मुळशी तालुक्यात सर्वात जास्त मते घेणारे उमेदवार ठरू शकतात असे आता चित्र आहे.

             याला कारणही तसेच आहे, मुळशी तालुक्यात 121 कोटींपेक्षाही अधिक विकासकामे आमदार फंडातून केली आहेत. तसेच इतरही कामं चालू आहेत. सोबतीला राष्ट्रवादी पक्षही नेटाने व एकदिलाने काम करत आहे. युती सरकारला लोकं वैतागली असून अब की बार, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र यार… असे आताच जनता विचारत आहे.

             थोपटेंची यंदाची लढत तिरंगी ठरणार असून सेना उमेदवार आणि अपक्ष उमेदवार असे दोघांचे तगडे आव्हान त्यांना असणार आहे. युती सरकारच्या कामगिरीवर नाराज जनता युतीला सत्तेत बसू देण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. तर संग्राम थोपटे यांच्यासारखा आदर्श आमदार असल्याने भोर-वेल्हे-मुळशी तालुक्यांत विकासकामांचा डोंगर उभा राहू शकतो अशी पावती खासदार सुप्रिया सुळे यांनीही दिली आहे.

             माण–हिंजवडी जिल्हा परिषद गटात एकुण 33 कोटींची विकासकामं केली असून येथून मोठे मताधिक्य मिळणार असल्याची शाश्वती मतदार आणि कार्यकर्त्यांनी दिली आहे. तर पिरंगुट-बावधन जिल्हा परिषद गटात 44 कोटींची आणि पौड-कासारआंबोली जिल्हा परिषद गटांत 44 कोटींची कामे केल्याने थोपटेंना मतं मागण्याचा पुर्ण अधिकार असल्याचे जनता जनार्दना मधून प्रतिक्रिया उमटत आहे.

             याउलट 5 वर्ष सत्तेत असणार्या व थोपटेंच्या विरोधात निवडणूक लढवणार्या पक्षाने मुळशीसाठी काय केले याचाही जनता विचार करत असल्याचे आघाडीचे कार्यकर्ते सांगत आहेत. विरोधी पक्षाच्या मित्र पक्षाने या मतदार संघावर दावा केला असता, त्यांना तो मतदार संघही मिळाला नाही, त्यामुळे तो मित्रपक्षही नाराज असू शकतो. शेवटी पक्षांची गणितं काय होतात यावरही विरोधी उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.

आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम थोपटे हे ही डिजीटल प्रचारात आघाडीवर असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.

विकासाला साथ सदैव राहु द्या

Posted by भोर कॉँग्रेस मीडिया on Tuesday, 15 October 2019

             आमदार कोण व्हावं हे मुळशीकर जनतेच्या हातात असल्याचे सध्या तरी वातावरण आहे. त्यामुळे मुळशीकर ज्याला कौल देणार, तोच विजयी होणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा म्हटले तरी चालेल. विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मागच्याच वेळी थोपटे यांनी पराभूत केले होते. त्यामुळे मुळशीकरांची मदत लाभूनही परिवर्तन काही घडले नाही. आताही तीच जुनी लढत नव्याने होत असल्याने प्रतिनिधीच बदलला नसल्याने परिस्थिती कशी बदलेल असा सवालही विचारला जात आहे. एकंदरीत थोपटेंना अनुकूल वातावरण सध्या भोर विधानसभेत दिसत आहे.

             तथापि मुळशीतील एक अपक्ष उमेदवार हे ही प्रचारात जोमात आहेत. त्यांची भिस्त मात्र न पलटलेल्या पत्त्यांसारख्या असंख्य कार्यकर्त्यांवर अवलंबून आहे. त्यांनी काय हेरून ठेवलेय हे सांगणे अवघड आहे. पण त्यांचीही विजयाची गणितं ठरलेली आहेत. मात्र जनेतेने विकासकामाला कौल दिल्यास थोपटे हेच सर्वात जास्त मते मिळवणारे उमेदवार मुळशी तालुक्यात नक्कीच ठरू शकतात.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here