आमचं ठरलंय, आघाडीच्या थोपटेंनाच निवडून द्यायचंय : मुळशी राष्ट्रवादीची गर्जना

0
1491

मुळशी धरणभागात आघाडीच्या संग्राम थोपटेंना भरघोस प्रतिसाद मिळाला असून नागरिक सभेला गर्दी करत आहेत.

स्वराज्यनामा ऑनलाईन  :  आघाडीच्या संग्राम थोपटेंच्या झंझावाती प्रचार दौर्याचा मुळशीकरांनी मंगळवारी अनुभव घेतला. त्यातच शरद पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आघाडीतल्या संग्राम थोपटे यांना मोठ्या फरकानं निवडून द्यायची मुळशी तालुका राष्ट्रवादीने गर्जना केली आहे. दौर्यात राष्ट्रवादी पदाधिकार्यांची असलेली उपस्थिती थोपटे निवडून आल्यात जमा आहे असं सांगणारीच होती.

              करमोळी, रावडे, खुबवली, असदे, शिळेश्वर, भादस, संभवे, माले, शेरे, दिसली, जामगाव, अकोले, कळमशेत, आंदेशे, मांदेडे, खेचरे, बेलावडे, चिंचवड, कोंढावळे, पौड, विठ्ठलवाडी, पौड, भुगाव, बावधन या गावांमध्ये काल प्रचंड प्रतिसादात प्रचार दौरा पार पडला. धरण परिसरात तर नवं चैतन्य पहायला मिळालं. धरणभागात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात एकवटले होते.

              या प्रचार दौर्यास माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सविता दगडे, उपसभापती पांडूरंग ओझरकर, महादेव कोंढरे, सुरेश हुलावळे, शिवाजी बुचडे, गंगाराम मातेरे, कोमल वाशिवले, शांताराम जांभुळकर, सुनिल चांदेरे, दत्तात्रय साखरे, सुरेश निकाळजे, शिवाजी जांभुळकर, संतोष साखरे, राहुल जाधव, सुनिल वाडकर, निलेश पाडाळे, सुहास भोते, सुरेश पारखी, राम जांभुळकर, योगेश ठोंबरे, दिग्विजय हुलावळे, सतिश सुतार, शरद शेंडे, राहुल जांभुळकर, विठ्ठल रानवडे, उज्ज्वला पिंगळे, सुहास शेंडे विविध ग्रामस्थं, महिला मंडळ उपस्थित होते.

              युती सरकारने शेतकर्यांचे, सर्वसामान्य चाकरमान्यांचे आणि सर्वच थरातील नागरीकांचे मोठे हाल केले. मंदीचं सावट असताना मोठमोठ्या गप्पा मारल्या जात आहेत. तसेच शरद पवार साहेबांना ईडीचा ससेमिरा मागे लावल्याने खर्या अर्थाने पवार साहेबांवर प्रेम करणारा मुळशीकर मोठा दुःखावला आहे. महाराष्ट्राच्याच अस्मितेला धक्का लावायचं काम पवार साहेबांवरील ईडीच्या नोटीसीमुळं झालेलं आहे. त्यामुळे आता या सरकारला अद्दल घडवायची सुवर्णसंधी लोकशाहीने निवडणूकीच्या स्वरूपात दिली असून मुळशीकर नागरीक ती कधीही चुकवणार नाहीत.

              याउलट महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी जेथे तेथे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देणार आहेत. त्यामुळे संग्राम थोपटे हे तिसर्यांदा भोर विधानसभेतून निवडून जाऊन विधायक काम करायला तत्पर असलेले 24 तारखेला निकालाच्या दिवशी पहायला मिळणार असल्याची नागरीकांना 100 टक्के खात्री आहे. राष्ट्रवादीनेही मुळशी तालुक्यात त्यासाठी मोठी कंबर कसली असून मुळशीतून मोठी आघाडी देण्याची तयारी चालवली आहे.

आमदार संग्राम थोपटे यांना निवडून आणण्यासाठी एकवटलेले मुळशी तालुका कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here