राजगड पायथ्याला नानांची स्वारी, प्रचारात कपबशीच लय भारी

0
586

राजगड पायथा, ता.वेल्हे येथे कपबशीचा प्रचार करताना अपक्ष उमेदवार आत्मारामनाना कलाटे आणि उपस्थित मान्यवर.

स्वराज्यनामा ऑनलाईन :  मंगळवारचा दिवस वेल्हे तालुक्यात कपबशीच्या प्रचाराने धूम घातली. जोरदार प्रचारासह भोर विधानसभेचे अपक्ष उमेदवार आत्माराम नाना कलाटे यांनी हितचिंतक आणि ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा मिळवला. उत्स्फुर्त आणि भरघोस असा प्रतिसाद मिळवत नानांनी विजयाची जोरदार आखणी केल्याची चर्चा पुर्ण वेल्हे तालुक्यात पहायला मिळाली आहे.

            वेल्हे तालुक्यातील शिवरायांच्या राजगड पायथ्याला आत्माराम कलाटे यांनी मावळ्यांना मतदानाचे आवाहन केले. मावळे हे परिवर्तनाचे नुसते साक्षीदार झाले नाहीत तर भागीदारही झाले, त्यामुळे हिंदवी स्वराज्य घडले. आज जनतेला सुराज्य हवे आहे. ते जुन्यांनी अजुनही अस्तित्वात न आणल्याने परिवर्तन अटळ आहे. म्हणूनच मावळ्यांना आता त्याच त्याच लोकप्रतिनिधींचा कंटाळा, त्रागा आला असून ही अखंड मावळी जनता नव्या चेहर्याच्या अपक्ष आत्माराम कलाटे यांना निवडून देतील आणि परिवर्तनाच्या लढाईचे भागीदारही होतील, अशी ठाम आशा अपक्ष उमेदवार कलाटे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली.

            वेल्हे तालुक्यातील सोंडे हिरोजी, सोंडे सरपाले, सोंडे कार्ला, सोंडे माथना, वडगाव झांजे, सुरवड, कोदवडी, दामगुडे आसनी, मार्गासनी आसनी, भागीनघर तसेच चिरमोडी, गुंजवणे, साखर, मेराव्हणी, लव्ही, वाजेघर बु., वाजेघर खु., घावर, मार्गासनी या गावांमध्ये कपबशीचा प्रचार जोमात झाला आहे.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here