आघाडी काळातल्या नगरपंचायत निर्णयाला युती सरकारचा विरोध – थोपटे

0
698

दिगंबर आळी, पौड. ता.मुळशी येथे जाहिर सभेस उद्देशून बोलताना आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम थोपटे.

स्वराज्यनामा ऑनलाईन : तालुक्याच्या ठिकाणी नगरपंचायत करण्याचा आघाडी सरकारने निर्णय घेतला होता. युती सरकारने सत्तेवर आल्यावर तो रद्द केला. त्यामुळे पौड आणि वेल्हा ह्या तालुक्याच्या गावांचा विकास ग्रामपंचायत माध्यमातूनच चालू असल्याने होणारी विकासकामे रेंगाळली आहेत, अशी आमदार संग्राम थोपटे यांनी युती सरकारवर पौड येथे टीका केली.

               भोर विधानसभेचे आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे हे प्रचारानिमित्ताने मुळशी तालुक्यातील पौड गावात आले होते. पौड येथील दिंगबरनाथ आळी येथे आमदार संग्राम थोपटे यांचे फटाके वाजवून जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे, काँग्रेस तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरे, दादाराम मांडेकर, सुनिल चांदेरे, सुहास भोते, माजी सभापती कोमल वाशिवले, दिपाली कोकरे, रोहिदास केमसे, मधुर दाभाडे, उज्वला पिंगळे, भगवान नाकती, संपत दळवी, रमेश पानसरे, नवनाथ लांडगे, भास्कर राऊत, सुरज पिंगळे, शशिकला उबाळे, ज्योती उबाळे, शालिनी राऊत, सविता कुंभार, राजेंद्र पिंगळे, विपुल गुजराथी, राजेंद्र ओंबळे, साजिद मुलाणी आदी उपस्थित होते.

               यावेळी थोपटे यांनी आपल्या भाषणात युती सरकार तसेच स्थानिक उमेदवारावरही निशाणा साधला. युती सकारबाबत ते म्हणाले की, या सरकारच्या कार्यपध्दतीमुळे देशात मंदीची लाट आलेली आहे. याचा परिणाम नोकऱ्या व रोजगारावर आला आहे. अजूनही हे सरकार नोकऱ्या देऊ, रोजगार देऊ असे गाजर जनतेला दाखवत आहे. महिनाभराचे काम पंधरा दिवसावर या सरकारने आणून ठेवले असून जाईल तिथे मंदी दिसत आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे भोर विधानसभा अध्यक्ष सुनिल चांदेरे यांनी सुध्दा विरोधकांवर जोरदार टिका केली.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here