कपबशीचा जोर वाढू लागला, नानांना पाठिंबा मिळू लागला

0
703

स्वराज्यनामा ऑनलाईन  :  कपबशी घेऊन लढणार्या आत्माराम नाना कलाटेंना वेल्हे तालुक्यातून मोठा पाठिंबा दिसू लागला आहे. कलाटे यांच्या वेल्हे दौर्यात लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. कपबशीकडे लोकांचा ओढा वाढत असल्याची ही नांदी दिसू लागली आहे.

            वेल्हे हा पुणे जिल्ह्यातल्या सर्वात लहान तालुका. तितकाच तो अति दुर्गम आणि दुर्लक्षित राहिलेला. भोर विधानसभा मतदार संघात वेल्हे तालुक्याला तर एवढे विचारातही घेतले जात नाही, अशा तालुक्याला आता परिवर्तनाची संधी हवी आहे. कारण परिस्थिती बदलण्यासाठी आता नवा लोकप्रतिनिधी हवा आहे. वेल्हेतील जनता त्याच त्याच परिस्थितीला वैतागली असून भरडली जात असल्याची भावना ग्रामस्थांनी बोलून दाखवली. अच्छे दिन तर आलेच नाहीत, वर तोंड दाबु बुक्क्यांचा मार अशी अवस्था वेल्हे तालुक्याची सद्यस्थितीत आहे.

              नाना कलाटेंनी वेल्हे येथील जनतेला विकासच्या प्रक्रीयेत वेल्हे तालुक्याला कधीच मागास ठेवणार नाही अशी ग्वाही प्रचारा दरम्यान दिली आहे. वेल्हे तालुक्याचं स्वतंत्र अस्तित्वं तयार केलं जाईल आणि वेल्हेकरांच्या प्रगतीमध्ये मोलाचा वाटा उचलणार असल्याचे आश्वासन दिले आहे. प्रचारात नानांनी वेल्हे तालुक्यात आघाडी घेतली असून गावागावांत जोरदार आणि उत्स्फुर्त स्वागत केले जात आहे. वेल्ह्यातील मावळी जनता खर्या अर्थाने स्वाभिमानी असून कोणत्याही गोष्टिंना न जुमानता प्रस्थापित उमेदवारांविरोधात एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून उभे राहण्याची जी हिम्मत नानांनी दाखवली त्याला नक्कीच भरभरून साद देणार आहेत, अशी मनिषा ग्रामस्थांनी बोलून दाखवली.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here