मुळशी तालुका कुस्तीगीर संघाचा संग्राम थोपटेंना जाहिर पाठिंबा

0
661

संग्राम थोपटे यांना जाहिर पाठिंबा दिल्यानंतर मुळशी तालुका कुस्तीगीर संघाने त्यांचा पुष्पहार घालून सत्कार केला.

स्वराज्यनामा ऑनलाईन :  मुळशी तालुका कुस्तीगीर संघाने आघाडीचे भोर विधानसभेचे उमेदवार संग्राम थोपटे यांना पाठिंबा जाहिर केला आहे. कुस्तीगीरांच्या पाठिंब्यामुळे थोपटे यांचे पारडे अधिकच जड झाले आहे.

             काँग्रेस आणि राष्ट्रवादी व मित्रपक्षांच्या आघाडीचे उमेदवार म्हणून विद्यमान आमदार संग्राम थोपटे हे निवडणूक लढवत आहेत. सलग दोनदा 2009 व 2014 ला ते भोर विधानसभेवर निवडून जात आहेत. या दहा वर्षाच्या कालखंडात भोर-वेल्हे-मुळशी या तीन्ही तालुक्यात केलेल्या गौरवास्पद विधायक कार्यामुळे, तसेच या तालुक्यातील अडीअडचणी लक्षात घेवून सोडवणूक करण्याच्या दृष्टीने केलेल्या कार्यवाहीमुळे संग्राम थोपटे यांना जाहिर पाठिंबा दिला असल्याचे कुस्तीगीर संघाने स्पष्ट केले आहे.

             काँग्रेस पक्षाने तिसर्‍यांदा दिलेल्या संधीचा फायदा घेऊन हॅटट्रिक करणार असा विश्‍वास व्यक्त करत मुळशी तालुका कुस्तीगीर संघाने थोपटेंना समर्थन दिले आहे. जनतेचे प्रश्‍न असेच सोडवत रहावे, विविध प्रश्‍न मार्गी लावावेत आणि अशीच विकासकामं करत रहावीत अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.

            यावेळी आमदार संग्राम थोपटे, मुळशी तालुका कुस्तीगीर संघटनेचे तालुका अध्यक्ष शिवाजी तांगडे, सेक्रेटरी के.बी.चौधरी, दादाराम मांडेकर, शिवाजी बुचडे, स्वस्तिक चोंधे, राहुल जाधव, गंगाराम मातेरे, नामदेव माझिरे, कैलास चोंधे, सतिश ववले, तुषार माझिरे आणि विविध पैलवान मंडळी उपस्थित होते. पैलवानांच्या पाठिंब्याने थोपटेंना आता तर भोरची लढाई अधिक सोप्पी झाली आहे. भोरचे मैदान ते मोठ्या फरकाने मारतीलच असा ठाम विश्वास पैलवान मंडळींनी व्यक्त केला आहे.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here