मुळशीतील सर्वच गावांमध्ये थोपटे यांचे काम पोहोचले – सविता दगडे

0
1307

स्वराज्यनामा ऑनलाईन : आमदार संग्राम थोपटे यांच्या माध्यमातून मुळशीतील सर्व गावांमध्ये विकासाचं काम झालेलं पहायला मिळत आहे. असे मत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सविता दगडे यांनी कोळवण खोर्यातील प्रचार दौर्यावेळी व्यक्त केले. या प्रचार दौर्याचे लोकांनी उत्स्फुर्त स्वागत केले.

          या वेळी आमदार संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरूपा थोपटे, माजी सभापती उज्वला पिंगळे, भोर तालुका काँग्रेस महिला अध्यक्षा दिपांजली शेटे, माजी जिल्हा परिषद सदस्या गीता आंबवले, महिला उपाध्यक्षा जाधव ताई, रुपाली साठे, पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया राष्ट्रवादी सतिश सुतार, भोर वेल्हा मुळशी विधानसभा अध्यक्ष सागर धुमाळ, कुमार शेडगे, काँग्रेस चे युवा नेतृत्व मधुर दाभाडे, युवा नेतृत्व संदीपभाऊ केदारी, वळणे गावचे सरपंच समिर सातपुते उपस्थित होते.

          स्वरूपा थोपटे म्हणाल्या की, मुळशी तालुक्याला संग्राम थोपटे यांनी अग्रभागाने जास्त महत्व देऊन विकासकामं केली आहेत आणि भविष्यातही विकासकामं मोठ्या प्रमाणावर केली जाणार आहेत. दगडे म्हणाल्या की, मुळशीतील दुर्गम आणि डोंगरी वाड्या वस्त्यांवर देखिल थोपटेचं काम पोहोचलं आहे. त्यामुळे थोपटे यांना मताधिक्य मुळशीतील सर्वच भागातून मिळणार आहे. गीतांजली आंबवले, गीतांजली शेटे यांनीही मुळशी तालुक्यातून थोपटे यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याचे सांगितले.  

आमदार संग्राम थोपटे यांचा उद्या मुळशी धरणाजवळील गावांपासून ते पौड, पिरंगुट, भुगाव ते बावधनपर्यंत प्रचार दौरा आयोजित केला आहे.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here