घोटवडेतून १०० टक्के थोपटेंना आघाडी देऊ – माजी सरपंच घोगरे

0
993

घोटवडे, ता.मुळशी येथे प्रचारादरम्यान संग्राम थोपटे यांचे सुवासिनींकडून औक्षण करण्यात आले.

स्वराज्यनामा ऑनलाईन : संग्राम थोपटे यांना घोटवडे गावातून १०० टक्के आघाडी देऊ असे माजी सरपंच आनंदा घोगरे यांनी व्यक्त केले आहे. घोटवडे, ता.मुळशी येथे आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांच्या प्रचारार्थ सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते.
             यावेळी उमेदवार थोपटे यांच्यासह सुरेश हुलावळे, शिवाजी बुचडे, दादाराम मांडेकर, बाळासाहेब सणस, शिवाजी जांभुळकर, गंगाराम मातेरे, सुनिल वाडकर, सुरेश निकाळजे, रमेश शेळके, आनंदा घोगरे, तात्यासाहेब देवकर, बाळासाहेब गोडांबे, विठ्ठल गोडांबे, संतोष साखरे, पंढरीनाथ गोडांबे सागर साखरे, दत्ता साखरे, राहुल जांभुळकर, दिग्विजय हुलावळे, प्रशांत रानवडे, विठ्ठल रानवडे, प्रविण जांभुळकर, मल्हारी साखरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
             पुढे बोलताना घोगरे म्हणाले की, संग्राम दादा हे पुढच्या पैलवानाला निवडणुकीत १००% चितपट करणार असून आमच्या घोटवडे गावात केलेल्या विकास कामांच्या पार्श्वभूमीवर त्यांना आघाडी देणं हे आमचं कर्तव्य आहे, ते आम्ही पार पाडू.
             यावेळी बोलताना थोपटे म्हणाले की, घोटवडे येथील पुलाच्या दोन्ही बाजूला डांबरीकरण व भक्कम करण्याची कारवाई नक्कीच होणार आहे. चाले मुगावडे पर्यंत रस्त्याचे कामही पाऊस पडत असल्याने थांबले आहे. ते लवकरच पूर्ण होईल. इतर अनेक छोटीमोठी कामे भविष्यात मार्गी लावण्यासाठी काम करण्याची संधी सुज्ञ मतदार देतील यात शंका नाही.

प्रचारात थोपटेंची आघाडी, माण-हिंजवडी जिल्हा परिषद गट काढला पिंजून

             प्रचारात थोपटे यांनी मुळशीत आघाडी घेतली आहे. रिहे खोरं आणि घोटवडे पर्यंत आज पिंजून काढले आहे. आंधळे, कातरखडक, पिंपळोली, खांबोली, जवळगाव, केमसेवाडी, पडळघरवाडी, रिहे आणि घोटवडे भागाचा दौरा दुपारपर्यंत पूर्ण केला होता. ठिकठिकाणी त्यांचे औक्षण करण्यात आले. घोटवडे गावातील श्री छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून गावठाणातून पदयात्रा काढली. फटाक्यांची माळ वाजवून थोपटे यांचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
             त्यांनतर थोपटे यांनी मुळशीच्या पूर्व भागात दौरा सुरू केला. भोईरवाडी, माण, हिंजवडी, मारुंजी, नेरे, कासारसाई, जांबे, ताथवडे, म्हाळुंगे, सुस या भागात प्रचार दौऱ्याकडे कूच केली. घोटवडे, रिहे खोऱ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोकांनी विजयासाठी थोपटेंना शुभेच्छाही दिल्या.

व्हिडीओ पहा : घोटवडे, ता.मुळशी येथे आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांच्या प्रचारार्थ काढलेली पदयात्रा

आघाडीचे भोर विधानसभेचे उमेदवार, विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रचारार्थ घोटवडे, ता.मुळशी येथील गावठाणातून निघालेली पदयात्रा.

Posted by स्वराज्यनामा on Sunday, 13 October 2019
ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here