आत्माराम नाना कलाटे भोरमध्ये उद्या करणार कपबशीचा प्रचार

0
820

स्वराज्यनामा ऑनलाईन : मुळशी तालुक्यातून भोर विधानसभेसाठी अपक्ष उमेदवार आत्माराम नाना कलाटे यांचा उद्या रविवार दि. 13 ऑक्टोंबर रोजी भोर तालुक्यात झंझावाती दौरा आहे. भोरमधील वीसगाव खोरे आणि इतर गावांमध्ये हा दौरा असून नानांना भरघोस प्रतिसाद मिळणार असल्याची शक्यता आहे.

             मुळशी तालुक्यात नानांना मिळत असलेला पाठिंबा पाहून भोर तालुक्यात लोकप्रतिनिधीवर नाराज असलेल्या जनतेकडून नानांना मोठा पाठिंबा मिळू शकतो. लोकप्रतिनिघी बदलण्यासाठी कलाटे यांच्या रुपाने एक सक्षम पर्याय उपलब्ध झाल्याचे मतदार म्हणत आहेत. परिवर्तनाची लाट आणण्याची क्षमता कलाटे यांच्याच पॅर्टनमध्ये असल्याची खात्री भोरमधील मतदारांना पटली असल्याचे प्रचारातील र्कायकर्त्यांचे म्हणणे आहे.

             आत्माराम नाना यांच्या सौभाग्यवतीही आज भोर दौर्‍यावर प्रचारात आघाडीवर होत्या. महिला व ग्रामस्थांची त्यांनी भेट घेऊन कपबशीचा प्रचार केला. भोर तालुक्यातून उर्त्स्फुत प्रतिसाद मिळाला. मुळशी तालुक्यात रिहे, मुठा, कोळवण, पिरंगुट परिसरात नानांचे उर्त्स्फुत स्वागत आणि पाठिंब्याची शिदोरी मिळाली आहे. त्या जोरावरच विजयाचा महामेरू पर्वत ते नक्कीच उभा करतील, अशी आशा त्यांच्या समर्थकांना आहे.

             वीस गाव खोर्‍यातील निलकंठ-गोकवडी, आंबाडे, बालवडी, नेरे, पाले, वरवडी खुर्द, वरवडी डायमुख, वरवडी बुद्रूक, पळसोशी, उदानखानवाडी, धावडी, मानकरवाडी, बाजारवाडी, हातनोशी, खानापूर, भाबवडी, भोर चौपाटी, भोर शहर, महुडे बु. येथे सकाळच्या सत्रात प्रचारदौरा आयोजित केला आहे. तर महुडे खुर्द, माळवाडी, ब्राम्हणघर ही.मा., नांद, शिंद, गवडी, नानाची वाडी, किवत, गणेश नगर, पसुरे, कर्नवडी, म्हाळवडी, बारे बु., बारे खुर्द, सरापूर, भोलावडे, कासुर्डी गु.मा., कामथडी, उंबरे या गावांमध्ये दुपारच्या सत्रात प्रचार व पदयात्रा होणार आहे.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here