मल्लिकार्जुन मंदिरात अभिषेक करून कलाटे यांच्या प्रचाराला सुरवात

0
625

स्वराज्यनामा ऑनलाईन : अपक्ष उमेदवार आत्माराम नाना कलाटे यांनी भोर विधानसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ पौड, ता.मुळशी येथे केला. पौड येथील श्री मल्लिकार्जून महादेव मंदिरात अभिषेक करून आपल्या प्रचाराचा नारळ फोडला.

             कलाटे यांनी श्री मल्लिकार्जूनाचे दर्शन घेऊन पौड गावातून नागरिकांच्या गाठी भेटी घेत पदयात्रा काढली. यावेळी नागरिकांचा आत्माराम नाना यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पौड बसस्थानक येथून सुरू झालेली हि पदयात्रा दिंगबरनाथ मंदिर,  बाजरपेठ येथून मागील आळी येथे गेली. तहसिल आवारातील श्री छत्रपतींच्या पुतळ्यास आणि पंचायत समिती येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.

            पदयात्रे दरम्यान कलाटे यांच्या समवेत जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर हे सुध्दा उपस्थित होते. अनेक कार्यकर्ते यामध्ये ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी यांचा मोठा समावेश होता. मुळशी, भोर आणि वेल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कलाटे यांनाच विधानसभेत भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. ज्येष्ठ नेते आणि ग्रामस्थांनी आपली मनोगते व्यक्त केली.

आत्माराम नाना कलाटे यांची अपक्ष उमेदवारी भोर विधानसभेसाठी ठरणार कलाटणी ?

            आत्माराम नाना कलाटे हे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक आहेत. राष्ट्रवादी पक्षातून त्यांनी नुकताच शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. शिवसेनेकडून ते भोर विधानसभेसाठी ईच्छूक होते. पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवून दोन्ही प्रबळ दावेदार पक्षाच्या उमेदवारांपुढे मोठे आव्हान निर्माण केले आहे.

            मुळशीतील एक प्रभावी नेता म्हणून नानांची ओळख आहे. बॅंकेच्या माध्यमातून ग्रामीण जीवनाशी त्यांची नाळ जोडली आहे. त्यांचं आव्हान नक्कीच कॉंग्रेस व शिवसेना पक्षांच्या उमेदवारांना नाकीनऊ आणणारं ठरणार आहे. त्यात स्थानिक मुळशीकर असल्याने त्यांच्याकडे भोर विधानसभेत किंगमेकर ठरू शकणार्या मुळशी तालुक्याचा ओढा अधिक असणार आहे. त्यामुळे मुळशीमध्ये वरचढ कोण अशी स्पर्धा निर्माण झाली असून मुळशीचा स्वाभिमान नक्की काय फरक पाडणार हे आता निकाला दिवशीच कळेल. एवढं मात्र नक्की कलाटे यांची अपक्ष उमेदवारी भोर विधानसभेच्या निकालात कलाटणी ठरणारी असेल, यात शंकाच नाही.

अपक्ष उमेदवार आत्माराम कलाटे यांच्या प्रचारार्थ पौड, ता.मुळशी येथे जमलेले नागरीक आणि ग्रामस्थं.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here