भोर-शिरवळ रस्त्यावर एकाकडून गावठी पिस्टल व काडतुस जप्त

0
804

गावठी पिस्टल व जिवंत काडतुस बाळगणारास पुणे ग्रामीण एलसीबी पथकाने सापळा रचून अटक केली.

स्वराज्यनामा ऑनलाईन : गावठी पिस्टल व जिवंत काडतूस घेऊन फिरणारास पुणे ग्रामीण एलसीबी पथकाने आज अटक केली. भोर- शिरवळ रस्त्यावर वडगाव डाळ, सायमाळ येथे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
             पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एक व्यक्ति कमरेला गावठी पिस्टल व जिवंत काडतुस घेऊन फिरत होता. त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी दिपक उर्फ मोगल्या बाळासाहेब पासलकर (वय 27) रा.कुरण बु. वरचीवाडी, ता.वेल्हा, जि.पुणे यांस अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस असा एकुण 50 हजार चारशे रुपयांचा ऐवज बेकायदेशीरपणे बाळगल्यामुळे जप्त करण्यात आला आहे.
             पोलिस अधिक्षक संदिप पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार नेमलेले पोलिस उपनिरिक्षक अमोल गोरे, सहाय्यक फौजदार दिलीप जाधवर, पोलिस हवालदार राजू चंदनशिव, चंद्रकांत झेंडे, रवि शिनगारे, महेश गायकवाड यांचे पथक विधानसभा निवडणुक अनुषंगानुसार गस्त घालत होते. सदर गस्त घालत असताना त्यांनी ही कारवाई केली आहे. जप्त केलेला मुद्देमाल व आरोपीस भोर पोलिस स्टेशनला जमा करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here