स्वराज्यनामा ऑनलाईन :
मुळशी तालुक्यात महत्वाच्या पिरंगुट ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करन पुढील काळात त्यात भर घालत राहणार असल्याचे आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी पिरंगुट येथे सांगितले. पिरंगुट, ता.मुळशी येथे प्रचार दौऱ्याच्या वेळी ते बोलत होते.
संग्राम थोपटे यांनी भूगाव, भुकूम, पिरंगुट, लवळे या मोठ्या लोकवस्तीच्या गावांमध्ये प्रचारावर विशेष भर देऊन पिरंगुट येथे गोळे आळी ग्रामदैवत मंदिर, पवळे आळी ग्रामदैवत मंदिर, सम्राट अशोक नगर येथे ग्रामस्थांशी भेटीगाठी घेऊन संवाद साधला. मुठा खोऱ्यातील विविध गावांमध्ये आज प्रचाराचा दौरा पार पडला .
यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, राष्ट्रवादी पक्ष व अन्य मित्रपक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. थोपटे पुढे म्हणाले की, पिरंगुटची ग्रामपंचायत तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून या ठिकाणच्या विकास कामाना मागील दहा वर्षात मोठ्या प्रमाणात विकास निधी दिला आहे. पुढील काळातही विकास करण्याची संधी येथील मतदार देतीलच याची खात्री आहे.
पिरंगुटचे सरपंच चांगदेव पवळे, माजी सभापती सविता पवळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचारादरम्यान गोळे आळी व पवळे आळी येथील छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण केला.