भोर विधानसभा मतदारसंघात मतदान जनजागृती अभियान

0
365

स्वराज्यनामा ऑनलाईन :

कापूरहोळ प्रतिनिधी : भोर तालुक्यात ठीक-ठिकाणी मतदान जनजागृती बोर्ड लावून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरीकांना मतदानाचे महत्व समजावे व त्यांनी मतदानात उत्स्फुर्तपणे सहभाग घ्यावा यासाठी ही जनजागृती करण्यात आली आहे.

                मतदान जनजागृती स्विप 3 अंतर्गत 203 भोर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्विप 3 चे नोडल अधिकारी रवींद्र भालेराव व सहाय्यक सचिन घोणे यांनी ही अंमलबजावणी केली आहे. यामध्ये भोर तालुक्यातील भोर शहर नगरपालिका, व्यापारी असोसिएशन, नाभिक संघटना, केमिस्ट व ड्रग संघटना, डॉक्टर असोसिएशन व भोर तालुक्यातील गर्दीच्या ठिकाणी मतदान जनजागृती बोर्ड लावून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले.

                भोर विधानसभा मतदारसंघातील विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयात जाऊन वोटर अवरेनेस फोरमची स्थापना करून मतदान शपथ ठिकाणी घेण्यात आली. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये माध्यमिक शाळांमध्ये तसेच उच्च माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून 25 हजार संकल्पपत्र भरून घेण्यात आली.

                इ एल सी ची स्थापना करून त्यांच्यामार्फत नवोदित मतदारांना त्यांच्या मतदान कर्तव्याची जाणीव करून देण्यात येत आहे. भोर तालुक्यातील प्रत्येक वाड्या-वस्त्यांवर शाळांमार्फत मतदान जनजागृती रॅली काढण्याचे काम सुरू आहे. निश्चितच मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदान टक्का दोन ते तीन टक्क्यांनी वाढला होता. या सर्व कार्यक्रमामुळे विधानसभेतील मतदानाचा टक्का वाढण्याची अपेक्षा आहे.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here