सैनिकी शाळेतील मुलींचे विजयादशमी निमित्त शानदार संचलन

0
1221

स्वराज्यनामा ऑनलाईन :  विजयादशमी निमित्त सैनिकी शाळेतील मुलींनी शानदार संचलन केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासारआंबोली, ता.मुळशी येथे आहे. येथे विजयादशमी निमित्त संचलन करून सिमोल्लंघन करण्यात येते.

           यावर्षी सुतारवाडी, अंबडवेट येथे संचलन करत ग्रामस्थांना देशभक्तीचा संदेश देण्यात आला. संचलनामध्ये काही विद्यार्थिनींनी घोड्यावर स्वार होऊन संचलनात सहभाग घेतला. यावेळी सुतारवाडी येथील महिला व ग्रामस्थांनी रांगोळी व फुलांच्या पायघड्या घालून सैनिकी शाळेच्या संचलनाचे स्वागत केले. संचलनाच्या पुढे असणा-या अश्वांना ओवाळून आणि पूजन करून त्यांना गुळ खोबरे चारण्यात आले.

           याप्रसंगी प्रशालेच्या प्राचार्या डॉ.सुलभा विधाते उपसरपंच शेखर शिंदे, माजी सरपंच गणेश सुतार, माजी सरपंच सुवर्णा सुतार, माजी उपसरपंच सुरेश सुतार, पर्यवेक्षक संदीप पवार, श्याम नांगरे,  श्री.चंद्रकांत बनसोडे सामाजिक कार्यकर्ते शशिकांत सुतार, नितिन विधाते आदि मान्यवर उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here