सुदीक्षा फाऊंडेशन, तेजोवलंय परिवारातर्फे आदिवासी कुटुंबियांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप

0
529

अंबडवेट(ता. मुळशी) येथे १०० आदिवासी गरजू कुटुंबियांना गृहपयोगी भांड्यांचे वाटप करताना सुदीक्षा फाऊंडेशन, तेजोवलंय परिवाराचे सदस्य.

स्वराज्यनामा ऑनलाईन : मुळशीतील १०० आदिवासी कुटुंबियांना गृहपयोगी भांड्यांचे वाटप करण्यात आले. सुदीक्षा फाऊंडेशन, तेजोवलंय परिवार आयोजित उद्योजिका अनिता अग्रवाल यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अंबडवेट, ता.मुळशी येथील राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्थेच्या कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला.

           या कार्यक्रमास सुदीक्षा फाऊंडेशन च्या संस्थापक व अध्यक्षा उमा गोपाळे विश्वनाथन, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संदीप साळुंके, श्यामला जोशी, कमिन्सचे संदीप क्षीरसागर, प्रशांत चितळे, किरण गहेरवार, ज्योती देशकर, सागर चव्हाण, महेश हल्लाळे, छगन माने, सुमन गोपाळे, राजेंद्र वाघ, राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्थेचे समन्वयक प्रदिप पाटील, सचिन आकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

           यावेळी आदिवासी बांधवांनी लोकगीते सादर केली. सुदीक्षा फाऊंडेशन च्या संस्थापक व अध्यक्षा उमा गोपाळे विश्वनाथन, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संदीप साळुंके, श्यामला जोशी यांनी शिक्षण व आरोग्य व व्यसनमुक्ती याविषयी जागृती निर्माण झाली पाहिजे, त्यांच्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यासाठी सर्वजन प्रयत्न करु असे मत मांडले.

            कमिन्स परिवारातील संदीप क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त करताना आम्ही सदैव आपल्या विकास कार्यासाठी प्रयत्नशील राहू अशी भूमिका मांडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण गहेरवार यांनी केले, सूत्रसंचालन सचिन आकरे तर आभार ज्योती देशकर यांनी मानले.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here