कोथरूडच्या तुळजाभवानी मंदिरात पारंपारिक मंगळागौर साजरी

0
535

स्वराज्यनामा ऑनलाईन : निरामय संस्थेच्यावतीने कोथरूड मधील जयभवानी टेकडीवरील तुळजाभवानी मंदिरात मंगळागौर कार्यक्रम सादर करण्यात आला. यासाठी लहान लहान मुलींनी पारंपारिक पद्धतीने वेशभूषा करून मंगळागौर सादर केली.

         कोथरूड मधील जय भवानी टेकडी येथील तुळजाभवानी मंदिरात दरवर्षी प्रमाणे यंदाही घटस्थापना करण्यात आली आहे. विद्युतरोषणाई करून मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. निरामय संस्था, सिंहगड रोड पुणे या संस्थेने दरवर्षी प्रमाणे यंदाही सहाव्या माळेला आपली हजेरी लावली.

         यावेळी संस्थेच्या संस्थापिका सौ. ज्योतिकुमार कुलकर्णी, विधा कुलकर्णी, संघटिका वैशाली नलावडे, प्रवीणा सपकाळ, सुपरवायजर सुनिता बारमुख आणि तुळजाभवानी मंदिरातील पुजारी कर्मचारी तसेच देवीचे भक्त गण उपस्थित होते.

         निरामय संस्था हि २००९ पासून कार्यरत आहे. या संस्थेस १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. संस्थेचे वर्ग २० ठिकाणी चालू आहे. पांरपारिक खेळ टिकून रहावा हाच या मागील उद्देश आहे असे सौ.बारमुख यांनी सांगितले.

नवरात्रीनिमित्त तुळजाभवानी मंदिरात पारंपारिक मंगळागौर हा कार्यक्रम सादर करण्यात आला.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here