व्यसन तु मानवा करु नको रं….

0
212

करु नको करु नको रंं…
व्यसन तु मानवा करु नको रं…

व्यसनामुळे बायका पोरं,
रस्त्यावरती आली रं…

सोन्यासारखा संसार तुझा
उघड्यावर पडला रं…

घरदाराची सारी
राखरांगोळी झाली रं…

शेतीवाडी, सोनं नानं
धुळीला मिळालं रं…

शरीरातील लिव्हर, किडणी
खिळखिळी झाली रं…

व्यसनामुळे कोणता
फायदाच नाही रं…

कॅन्सर, कर्करोग,
रक्तदाबाला निमंत्रण रं…

म्हणुन म्हणतो
व्यसन तु मानवा करु नको रं….
व्यसन तु मानवा करु नको रं….

– मृणाल मारणे

पुणे जिल्हा परिषद पुरस्कृत आदर्श शिक्षिका, बावधन

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here