साठेसाईत स्वच्छता व प्लॅस्टीक मुक्त अभियान

0
351

स्वराज्यनामा ऑनलाईन :  उन्नत भारत अभियानांतर्गत साठेसाई, ता.मुळशी येथे “स्वच्छता अभियान” व “प्लॅस्टिक मुक्त अभियान” राबवण्यात आले. साठेसाई ग्रामपंचायत व टिळक आयुर्वेद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबवण्यात येऊन स्वच्छतेचा व प्लॅस्टिकमुक्तीचा संदेश देण्यात आला.

          यावेळी सरपंच प्रविण साठे, डॉ.मोहन जोशी, डॉ.विकास जायभाय, डॉ.ऐश्वर्या रानडे, रोहिदास साठे, अनिकेत साठे, अक्षय साठे, विठ्ल खिलारी, शाळेतील शिक्षक बेंद्रे सर व पुरोहित मॅडम, शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थं उपस्थित होते. उपस्थित डॉक्टर आणि मान्यवर मंडळींचा सत्कारही करण्यात आला.

          या अभियाना अंतर्गत साठेसाई गावात प्रभात फेरी काढण्यात आली होती. घरोघरी जाऊन कापडी पिशवी वाटप करुन प्लॅस्टीक मुळे होणारे दुष्परिणाम नागरीकांना सांगण्यात आले.  तसेच स्वच्छतेचा आणि प्लॅस्टिक मुक्तीचा संदेश देण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पथनाट्यही सादर केले. ‘स्वच्छता हिच इश्वर सेवा’ ह्या उद्देषाने गावात सर्वत्र स्वच्छ परीसर असने नागरिकांना आरोग्याच्या दृस्टीने अत्यंत महत्वाचे आह, हे पटवून देण्यात आले. या वर्षी पावसाचे प्रमाण जास्त झाल्याने लोकांनी पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आल.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here