नेता देता का नेता?

0
1246

एके काळी मुळशीला
होते खासदार, आमदार
त्याच मुळशी मधले नेते
आज फिरतात दारो दार
सक्षम असून देखिल
डावलतात आता !!१!!
मुळशी साठी कोणी
नेता देता का नेता ..

पैलवानांची, कलाकारांची
कष्टकर्यांची मुळशी
पक्ष आहेत सगळे
नेते मात्र तळाशी
महाराष्ट्रात कधी काळी
यांचा दरारा होता..!!२!!
मुळशी साठी कोणी
नेता देता का नेता…

जिल्हा परिषदे पासून
अनेक आहेत नेते
खासदार, आमदार मात्र
बाहेरचेच येथे
दहा वर्षा नंतर तरी
न्याय हवा होता..!!३!!
मुळशी साठी कोणी
नेता देता का नेता….

आज सुध्दा नेते
एक होत नाही
म्हणून इथला नेता
त्यापासून वंचित राही
येणार्या क्षणाची
वाट पाहू आता..!!४!!
मुळशी साठी कोणी
नेता देता का नेता….

भाऊ केदारी
रा.लवळे, ता.मुळशी
9011890221

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here