भोरचा सामना ठरला, शिवसेनेकडून कुलदीप कोंडे आमदार थोपटेंविरूद्ध लढणार

1
3935

स्वराज्यनामा ऑनलाईन : भोर विधानसभेसाठी शिवसेनेची उमेदवारी कुलदीप कोंडे यांना जाहिर झाली आहे. कुलदीप कोंडे हे शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. सन 2014 मध्येही ते भोर विधानसभा निवडणूक शिवसेनेच्या तिकीटावर लढले होते. संग्राम थोपटे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. यंदाही शिवसेनेने त्यांना संधी देऊन निष्ठावंत शिवसैनिकांना न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे.

                 भोर विधानसभेच्या पुनःरचनेनंतर सन 2009 पासून आमदार संग्राम थोपटे हे कॉंग्रेसच्या तिकिटावर दोनदा निवडून आले आहेत. सलग दोनदा आमदार असल्याने संग्राम थोपटे दुर्गम असलेल्या भोर मतदारसंघात गावागावात माहित आणि परिचित असलेले उमेदवार आहेत. अशातच त्यांचे भाेर नगरपरिषद व वेल्हे पंचायत समिती यावर निर्विवाद वर्चस्व आहे. मुळशी तालुक्यात एकही पंचायत समिती सदस्य वा जिल्हा परिषद सदस्य नसला तरी कॉंग्रेसचे मतदान हे आकड्यांमध्ये निश्चित झाले आहे. तसेच केलेल्या विकासकामांमुळे थोपटे यांच्याकडे मुळशीतील नागरिकांचा ओढाही वाढला आहे. मागील दोन वेळेपेक्षा कोणत्याही परिस्थितीत अधिक मतदान थोपटे घेणार, यात विरोधकांनाही शंका नसेल. त्यामुळे कोण विजयी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

                 युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. शिवसेनेची ताकदही फार मोठी आहे. मात्र निर्णायक विजयाकडे वाटचालीसाठी मुळशीकरांची भुमिका आता फार महत्वाची ठरणार आहे. मुळशीकर सोशल नेटकरी मात्र शिवसेनेची उमेदवारी तालुक्याला न मिळाल्याने नाराज झालेले दिसत आहेत. मुळशीत कोणीही सक्षम नसल्याचे सर्वच पक्षांनी दाखवून दिले असल्याचे सोशल मिडीयात प्रतिसाद उमटले आहेत.

                 आघाडीत मतदारसंघ कॉंग्रेसकडे असून कॉंग्रेसचा मतदार हा पारंपारिक स्वरूपाचा आहे. कॉंग्रेसची फार मोठी ताकद या मतदारसंघात असून विजयाची घौडदौड रोखणं महाकठिण आहे. राष्ट्रवादी पक्ष संग्राम थोपटे यांना किती साथ देईल यावर थोपटेंचं भविष्यही अवलंबून राहिल. शिवाय वंचित बहुजन आघाडी मुळशीतून उमेदवार देऊ शकते. तसेच मनसे आणि इतर पक्षांचा फॅक्टरही जय परायज यांच्यावर प्रभाव दाखवेल. त्यांचा फायदा सेनेला की कॉंग्रेसला हे आता 24 तारखेलाच समजेल.

ही बातमी शेअर करा :

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here